कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका 'दुर्गा' आता एका रंजक वळणावर पोहोचली आहे. सध्या मालिकेत दुर्गा आणि अभिषेकच्या लग्नाचा ट्रॅक सुरू असून, सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. या आनंदाच्या क्षणीही दुर्गा अस्वस्थ आहे. दुर्गा अभिषेकला एक महत्त्वपूर्ण व्हॉईस नोट पाठवून आपल्या खऱ्या ओळखीचा खुलासा करते. हा निर्णय तिच्यासाठी मोठी जडणघडण निर्माण करतो.
दुर्गा लग्नाआधी व्हॉईस नोट पाठवते. त्यामुळे दुर्गाला थोडे बरं वाटते. दुर्गाला वाटते की, तिच्या मनाचा भार हलका झाला आहे परंतु त्याच वेळी अभिषेकचा मोठा भाऊ ती व्हॉईस नोट ऐकतो आणि दुर्गाला रिप्लाय देतो. त्यामुळे दुर्गाला समजते की, तिच्या आयुष्यात आणखी मोठे वळण येणार आहे. पुढे काय घडणार, दुर्गाचे सत्य कसे उघड होणार आणि त्याचा परिणाम कसा होणार? हे प्रेक्षकांसाठी पाहणे रोमांचक ठरणार आहे.
'दुर्गा' ही मालिका आता एका टर्निंग पॉईंटवर येऊन ठेपली आहे. दुर्गाच्या खरे बोलण्याचा प्रभाव तिच्या आणि अभिषेकच्या नात्यावर कसा होईल? अभिषेकला सत्य खरच माहिती आहे का? तो दुर्गाला आपलेसे करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दुर्गा आणि अभिषेक यांचा लग्नसोहळा प्रेक्षकांना या आठवड्यात पाहायला मिळणार आहे.
वाचा: महेश मांजरेकरांची पहिली पत्नी आहे तरी कोण? वाचा तिच्याविषयी
रुमानी खरे 'दुर्गा' मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे. तिने याविषयी बोलताना म्हटले आहे की, "लग्नासाठी दुर्गा खूप एक्सायटेड आहे. खरं सांगायचे झाले तर तिला वेळच मिळालेला नाही कारण तिच्या नशिबात इतकी संकटे आली आहेत. सर्वात आधी तिला समजले की, अभिषेक हा दादा साहेबांचा मुलगा आहे नंतर ते मान्य करणे, त्याच्यापासून लांब जाणे आणि मग त्याचा ॲक्सीडंट होणे. तेव्हा तिला लक्षात आले की, आपण काही ही केले तरी याच्यापासून दूर नाही जाऊ शकत आहे. दुर्गा आणि अभिषेक यांचे सुरळीत होताच आईसाहेबांनी डिक्लेर केले आम्ही तुमचे लग्न लगेच लावून देतो. त्यामुळे हे लक्षात यायलाच तिला खूप वेळ लागला आहे. दुर्गा ही अभिषेक वर प्रचंड मनापासून प्रेम करते तरी पण कुठेतरी हा प्रश्न आहे की, तो दादासाहेबांचा मुलगा आहे आणि आपण लग्न करुन त्याच घरात जाणार आहोत."