गौतमी-क्षितिजच्या लग्नाचे सत्य अखेर जान्हवीसमोर येणार; 'अंतरपाट' मालिकेत नवा ट्विस्ट-colors marathi antarpat serial update 6th august 2024 ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  गौतमी-क्षितिजच्या लग्नाचे सत्य अखेर जान्हवीसमोर येणार; 'अंतरपाट' मालिकेत नवा ट्विस्ट

गौतमी-क्षितिजच्या लग्नाचे सत्य अखेर जान्हवीसमोर येणार; 'अंतरपाट' मालिकेत नवा ट्विस्ट

Aarti Vilas Borade HT Marathi
Aug 06, 2024 06:50 PM IST

Antarpat Serial update: गौतमी आणि क्षितिजच्या लग्नाचे सत्य अखेर जान्हवीसमोर येणार आहे. त्यामुळे मालिकेच्या आगामी भागात काय होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

Antarpat Serial
Antarpat Serial

'अंतरपाट' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. काही दिवसांपासून कलर्स मराठीवरील ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. गौतमी-क्षितिजचा लग्नसोहळा, घटस्फोटाचा आलेला ट्विस्ट, जान्हवीची एन्ट्री या सर्वांमुळेच मालिका अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. आता पुन्हा एकदा मालिकेत एक रंजक वळण येणार आहे. गौतमी आणि क्षितिजच्या लग्नाचे सत्य अखेर जान्हवीसमोर येणार आहे.

गौतमी आणि क्षितिजमध्ये मैत्रिचे नाते

गौतमी आणि क्षितिजमध्ये मैत्रीचं नातं बहरतंय. गौतमीची आयुष्यात एन्ट्री झाल्यानंतर हतबल, निराश असलेला क्षितिज पुन्हा एकदा नव्याने आयुष्य जगू लागलेला पाहायला मिळत आहे. सर्व काही सोडून दिलेल्या क्षितिजने मुंबईत एक डीलदेखील क्रॅक केली आहे. आपल्या लेकाने मोठं यश संपादन केल्याने राजाराम यांचा आनंद गगनात मावेनासा होतो आणि ते एका पार्टीचं आयोजन करतात. या पार्टीसाठी गौतमीने तिच्या कुटुंबियांनादेखील आमंत्रित केलेलं असतं. पार्टीदरम्यान क्षितिजचं लग्न गौतमीसोबत झाल्याचं सत्य जान्हवीसमोर येतं. त्यामुळे आता पुढे काय घडणार हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

गौतमी-जान्हवीची ऑफस्क्रीन मैत्री कशी आहे?

गौतमी-जान्हवीच्या ऑफस्क्रीन नात्याबद्दल जान्हवी म्हणजेच प्रतीक्षा शिवणकर म्हणाली,"आम्ही फार छान मैत्रीणी आहोत. अनेक गोष्टी आम्ही एकमेकींसोबत शेअर करतो. त्यामुळे काम करताना दडपण येत नाही. छान मैत्री असल्याने ऑनस्क्रीनदेखील ते दिसून येतं. खऱ्या आयुष्यात आम्हा दोघींची लग्न झालेली असून मालिकेव्यतिरिक्त आम्ही भरपूर गप्पा मारत असतो."
वाचा: हे असलं घरात पाहण्यापेक्षा अडल्ट सिनेमा पाहिला असता; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’वर नेटकरी संतापले

मालिकेत सध्या घडत असलेल्या घटनांविषयी जान्हवी म्हणजेच प्रतीक्षा शिवणकरने मत मांडले आहे. "जान्हवीने एवढी वर्षे क्षितिजवर प्रेम केलंय. त्यांनी एकत्र सुखी संसाराची स्वप्न पाहिली होती. क्षितिजचं लग्न झाल्याचं सत्य जान्हवीला कळल्यापासूनच तिचं मानसिक खच्चीकरण सुरू झालंय. पण नुकतीच आयुष्यात आलेली एक चांगली मैत्रीण गौतमीच आपल्या प्रियकराची पत्नी आहे हे कळल्यावर तिचं आणखी खच्चीकरण झालंय. त्यामुळे आता यापुढे काय करायचं असा मोठा प्रश्न तिला पडलाय. तिच्यासमोरचे सर्व दरवाजे आता बंद झाले आहेत" असे जान्हवी म्हणाली.

विभाग