देवी तुळजाभवानीला भवानीशंकरांची खरी ओळख पटणार? 'आई तुळजाभवानी'मध्ये वेगळे वळण
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  देवी तुळजाभवानीला भवानीशंकरांची खरी ओळख पटणार? 'आई तुळजाभवानी'मध्ये वेगळे वळण

देवी तुळजाभवानीला भवानीशंकरांची खरी ओळख पटणार? 'आई तुळजाभवानी'मध्ये वेगळे वळण

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 22, 2025 05:16 PM IST

'आई तुळजाभवानी' ही मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेत एक वेगळे वळण आले आहे. देवी तुळजाभवानीला भवानीशंकरांची खरी ओळख पटणार? हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे.

Aai Tulja Bhawani
Aai Tulja Bhawani

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘आई तुळजाभवानी’ ही मालिका अतिशय लोकप्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवसापासूनच या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता या मालिकेत वेगवेगळ्या अनेक घटना घडत आहेत. आता देवीने शाकंभरी देवीच्या रुपात दर्शन दिले आणि सृष्टीचे महत्त्व सांगितले. तर दुसरीकडे, देवीच्या हाकेला ऐकून काळभैरव भूतलावर प्रकटले आहेत. देवी आपलं अढळ स्थान शोधण्याची जबाबदारी भैरवाला देते. या आठवड्याच्या उत्तरार्थात तुळजाभवानी आणि भवानीशंकर यांच्या नात्यातील रुसवे - फुगवे, नात्यातील गोड क्षण बघायला मिळणार आहेत. त्यांच्यातला समज – गैरसमजाचा गुंता अधिक वाढत जात असून भवानीशंकर रूपात पृथ्वीवर निवास करणाऱ्या महादेवांना देवी ओळखणार का ? हा रंजक कथाभाग उलगडत आहे.

‘आई तुळजाभवानी’ मालिकेत देवींची कन्या अशोकसुंदरीला आलेला भवानीशंकराबद्दलचा संशय वाढू लागला आहे. पण, महादेवांना देखील आई तुळजाभवानीसमोर खऱ्या रुपात येण्याची आतुरता लागून राहिली आहे. तर दुसरीकडे शृंगीचे पृथ्वीवर आगमन झाल्यावर साऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. पण, श्रुंगी महाराजांचं असं अचानक पृथ्वीवर येण्याचे नेमके कारण काय असेल ? याचा खुलासा हळूहळू होईलच.
वाचा: 'हिना खानचा कॅन्सर प्रवास हा पीआरने प्लान केला होता', अभिनेत्रीचे खळबळजनक वक्तव्य

भैरवाला देवीने अढळ स्थान शोधण्याची दिलेल्या जबाबदारीत अध्येमध्ये जाणवणारे शिवतत्व यामुळे देवीचा संशय बळावला असून देवींना सत्य समजल्यावर त्यांची नेमकी प्रतिक्रिया काय असेल, त्यांच्या रागात भर पडेल ? की कुटुंब एकत्र आल्याचा आनंद असेल? देवी तुळजाभवानीला भवानीशंकरांची खरी ओळख पटणार? हा अत्यंत उत्कंठावर्धक कथानकाचा प्रवास आगामी भागात पाहायला मिळणार आहे. मानवीरूपात देवांना ही भोगांना सामोरे जावे लागणे हा कथेचा विषय जितका अनोखा तितकाच आदिशक्तीच्या या रचनेपाठची लीला ही आवर्जून जाणून घेण्यासारखी आहे. तेव्हा मालिकेत पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.

Whats_app_banner