सध्या सगळीकडे लाइव्ह कॉन्सर्ट, स्टँडअप कॉमेडी शोची क्रेझ पाहायला मिळते. अनेकजण या शोची तिकिटे ऑनलाइन बुक करताना दिसतात. मुंबईत जानेवारी महिन्यात ग्रॅमी अवॉर्ड विजेता पॉप बँड कोल्ड प्लेचा कॉन्सर्ट होणार आहे. या कॉन्सर्टची तिकिटे बुक माय शो या वेब साईटवर विक्रिसाठी ठेवण्यात आली होती. पण देशभरातील चाहत्यांना हा कॉन्सर्ट पाहायचा असल्यामुळे तिकिट विक्रीची साईट क्रॅश झाली होती. फार कमी लोकांना याचे तिकिट मिळाले आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एका चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या कॉन्सर्टचे तिकिट मिळाल्यावर त्याची काय प्रतिक्रिया आहे हे पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.
कोल्ड प्ले या ब्रिटीश बँडचा कॉन्सर्ट मुंबईत होणार असल्याचे कळताच चाहत्यांना प्रचंड आनंद झाला होता. अनेकांना हा कॉन्सर्ट लाइव्ह पाहायचा आहे. रविवारी बुक माय शो या संकेत स्थळावर या कॉन्सर्टची तिकिटे विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. ही तिकिटे खरेदी करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. पण साईट डाउन झाल्यामुळे या कॉन्सर्टचे तिकिट मिळाले नाहीत. अशातच एका चाहत्याला कॉन्सर्टचे तिकिट मिळाले. त्यामुळे त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. हा चाहता तिकिट मिळाल्यामुळे जोरजोरात ओरडून नाचू लागला आहे. आजूबाजूला बसलेला त्याचा मित्र परिवार त्याच्याकडे केवळ बघत राहिला आहे.
सोशल मीडियावर या चाहत्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. एका यूजरने “असे वाटते की Coldplay त्याच्या घरी येत आहेत" असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट करत, “सामान्य परतफेडीसाठी SIP मध्ये गुंतवणूक करावी का की कोल्डप्लेची तिकिटे खरेदी करावीत?” असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने “अती उत्तम! आता त्यांच्या पहिल्या तीन अल्बममधील किमान पाच गाणी सांग,” असा थेट प्रश्न विचारला आहे.
वाचा: 'लाफ्टर शेफ'च्या सेटवर रीम शेखनंतर राहुल वैद्यचा अपघात, चेहऱ्यावर आली आग
मुंबईत १८, १९ आणि २१ जानेवारी रोजी कोल्ड प्ले हा बँड परफॉर्म करणार आहे. नवी मुंबईतील डिव्हाय पाटील या स्टेडीयममध्ये हा कॉन्सर्ट पार पडणार आहे. जानेवारी महिन्यात पार पडणाऱ्या या कॉन्सर्टच्या तिकिटांची आताच विक्री झाली. जवळपास तिनही दिवसांची सगळी तिकिटे विकली गेली आहेत.