मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणून प्रसाद ओक ओळखला जातो. त्याने नुकताच मुंबईत नवे घर खरेदी केली. आता त्याच्या या नव्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. प्रसादने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. त्याची ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल झाली आहे.
२०२४ या वर्षाच्या सुरुवातीलाच प्रसादने नवे घर घेतले. त्याने सोशल मीडियावर नव्या घरात शिफ्ट झाल्याचा व्हिडीओ शेअर केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसाद ओकच्या या नव्या घराच्या वास्तूशांतीसाठी हजेरी लावली होती. प्रसाद ओक याने याबाबत पोस्ट लिहून मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
वाचा: लेकीच्या प्रीवेडिंग सोहळ्यात बेभान होऊन नाचला आमिर खान! व्हिडीओ होतोय व्हायरल
प्रसादने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने 'आपले गुरु धर्मवीर आनंद दिघे साहेब, यांच्या पावलावर पाऊल टाकत आपण ज्या पद्धतीनी “माणूस” जोडता आहात ते पाहता “गुरुने दिला ज्ञानरुपी वसा…आम्ही चालवू हा पुढे वारसा” हे शब्द तंतोतंत खरे करताय असेच वाट' असे म्हटले आहे.
माझ्यासारख्या एका छोट्या कलाकाराच्या विनंतीला मान देवून…तुम्ही दिलेला शब्द पाळलात आणि वास्तू शांतीच्या दिवशी आमच्या घरी आलात. अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आलात. कोणताही राजकारणी अविर्भाव न ठेवता अगदी कुटुंबातलेच असल्याप्रमाणे आमच्या सोबत बसलात,जेवलात.. नीट निरखून आख्खं घर पाहिलंत.. हा प्रसंग आमच्या सगळ्यांच्या मनावर कायमचा कोरला गेला आहे. आपले गुरु धर्मवीर आनंद दिघे साहेब, यांच्या पावलावर पाऊल टाकत आपण ज्या पद्धतीनी “माणूस” जोडता आहात ते पाहता “गुरुने दिला ज्ञानरुपी वसा…आम्ही चालवू हा पुढे वारसा” हे शब्द तंतोतंत खरे करताय असंच वाटलं..!!
संबंधित बातम्या