सिनेरसिकांसाठी शुक्रवारचा दिवस खूप खास असणार आहे. खरं तर आज चार नवे सिनेमे थिएटरमध्ये दाखल झाले आहेत. इतकंच नाही तर तीन जुने सिनेमे 'सत्या', 'ये जवानी है दिवानी' आणि 'कहो ना प्यार है' देखील थिएटरमध्ये लोकांचं मनोरंजन करत आहेत. आज ‘सिनेमा लवर्स डे’ आहे आणि हा दिवस प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे. कारण आज सिनेरसिकांना ९९ रुपयांत या चित्रपटांचा आनंद घेता येणार आहे. आता कोणते सिनेमे ९९ रूपयांमध्ये पाहायला मिळणार चला जाणून घेऊया...
'पुष्पा २ : द रूल'ची रिलोडेड आवृत्ती आज चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आली आहे. या रिलोडेड व्हर्जनमध्ये तुम्हाला 20 मिनिटांचे एक्स्ट्रा फुटेज पाहायला मिळणार आहे. म्हणजेच आधी तीन तास १५ मिनिटांचा असलेला हा चित्रपट आता तीन तास ३५ मिनिटांचा होणार आहे.
कंगना रणौतचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'इमर्जन्सी' आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात मिलिंद सोमण, अनुपम खेर आणि महिमा चौधरी यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट गेल्या काही वर्षांपासून रखडला होता. आज अखेर तो सिनेमागृहामध्ये प्रदर्शित झाला आहे.
रवीना टंडनची मुलगी राशा थडानीचा पहिला चित्रपट 'आझाद' आज चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अजय देवगण आणि त्याचा भाचा अमन देवगण देखील दिसणार आहेत. आता या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहण्यासारखे आहे.
हॉलिवूड चित्रपट 'वुल्फ मॅन' चित्रपटगृहात आपले मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपटही प्रेक्षकांना केवळ ९९ रूपयांमध्ये पाहाता येणार आहे.
हॉलिवूड चित्रपट 'अ रिअल पेन'नेही चित्रपटगृहात धडक दिली आहे. हा सिनेमा देखील ९९ रुपयांमध्ये पाहायला मिळणार आहे.
वाचा: अमृता सिंगने एकदा सैफ अली खानला दिल्या होत्या झोपेच्या गोळ्या, काय होते कारण?
या चित्रपटांव्यतिरिक्त अभिनेता हृतिक रोशनचा पहिला चित्रपट 'कहो ना... प्यार है (२०००), मनोज बाजपेयीचा 'सत्या' (१९९८) आणि रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण स्टारर 'ये जवानी है दिवानी' (२०१३) हे चित्रपटही पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित झाले आहेत.
संबंधित बातम्या