मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Cinema Lovers Day : सिनेप्रेमींसाठी पर्वणी! अवघ्या ९९ रुपयांमध्ये थिएटरमध्ये पाहता येणार चित्रपट

Cinema Lovers Day : सिनेप्रेमींसाठी पर्वणी! अवघ्या ९९ रुपयांमध्ये थिएटरमध्ये पाहता येणार चित्रपट

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 23, 2024 03:03 PM IST

Cinema Lovers Day 2024: आज चित्रपटप्रेमींसाठी खास ‘चित्रपटप्रेमी दिन’ साजरा केला जात आहे. आजच्या या खास दिवशी सिनेप्रेमींना केवळ ९९ रुपयांमध्ये देशातील सर्व भागांतील चित्रपट पाहता येणार आहेत.

Cinema Lovers Day 2024
Cinema Lovers Day 2024

Cinema Lovers Day 2024 offer: आज २३ फेब्रुवारी हा दिवस सिनेप्रेमींसाठी खूप खास आहे. राष्ट्रीय चित्रपट दिनानंतर आज चित्रपटप्रेमींसाठी खास ‘चित्रपटप्रेमी दिन’ साजरा केला जात आहे. आजच्या या खास दिवशी सिनेप्रेमींना केवळ ९९ रुपयांमध्ये देशातील सर्व भागांतील चित्रपट पाहता येणार आहेत. देशातील आघाडीची मल्टिप्लेक्स चेन PVR-INOX लिमिटेडने प्रेक्षकांसाठी ही खास ऑफर आणली आहे. आज (२३ फेब्रुवारी) आज देशाच्या कोणत्या भागात आणि कुठे तुम्ही ९९ रुपयांमध्ये चित्रपट पाहण्याचा आनंद लुटू शकता, हे जाणून घेऊया...

सिनेमा प्रेमी दिन का साजरा केला जात आहे?

गेल्या काही आठवड्यांपासून सुस्त असलेली तिकीट खिडकी पुन्हा एकदा गजबजून जावी म्हणून शुक्रवार, २३ फेब्रुवारी हा दिवस ‘सिनेमा प्रेमी दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या खास दिवशी केवळ ९९ रुपयांमध्ये चित्रपट पाहण्याची संधी देऊन सिनेप्रेमींना आकर्षित करण्याचे काम करण्यात आले आहे. ही सवलत पाहून मोठ्या संख्येने प्रेक्षक थिएटरमध्ये पोहोचतील, हा या मागचा उद्देश आहे. या खास दिवशी PVR-INOX मल्टिप्लेक्स चेनमधील कोणत्याही थिएटरमध्ये ९९ रुपयांमध्ये चित्रपट पाहू शकता. आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि पाँडिचेरी ही दक्षिणेकडील राज्ये वगळता ९९ रुपयांची ही विशेष ऑफर देशभरात लागू आहे. या खास दिवशी प्रीमियम सिनेमा फॉरमॅट आणि रिक्लिनर सीटवरही मोठी सूट उपलब्ध असणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही कोणकोणते चित्रपट पाहू शकाल ते जाणून घेऊया...

- तेरी बातों मै ऐसा उल्झा जिया

- फायटर

- क्रॅक

- ऑल इंडिया रँक

हॉलिवूड चित्रपट

- होल्डओव्हर्स

- बॉब मार्ले-वन लव्ह

- मिन गर्ल्स

- द टीचर्स लाउंज

- मॅडम वेब

देशभरातील सर्व मोठ्या सिनेमागृहांमध्ये सगळ्याच चित्रपटांवर मोठ्या प्रमाणावर सूट उपलब्ध आहे. आजच्या दिवशी फक्त ९९ रुपये खर्च करून कोणत्याही चित्रपटाचा आनंद घेऊ शकता. मात्र, हे लक्षात ठेवा की ही ऑफर फक्त एका दिवसासाठी वैध आहे. अनेक प्रेक्षक या खास ऑफरचा लाभ घेत आहेत. तुम्हीही सिनेप्रेमी असाल तर या ऑफरचा अवश्य लाभ घ्या.

IPL_Entry_Point

विभाग