चित्रपटांच्या घटत्या विक्रीला सावरण्यासाठी आणि ऑक्युपेन्सी रेट वाढविण्यासाठी चित्रपटगृहे चित्रपटाच्या तिकिटांवर लक्षणीय सवलत देत आहेत. मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन हे दोन्ही थिएटर या उपक्रमांमध्ये सहभागी होत असून, ३१ मे रोजी चित्रपटप्रेमी दिनाचं निमित्त साधून या दिवशी खास तिकिटांची किंमत ९९ रुपये ठेवण्यात आली आहे.
पीव्हीआर आयनॉक्स, सिनेपोलिस इंडिया, मिरज सिनेमाज, मुल्टा ए २ आणि मूव्हीमॅक्स सह टॉप मल्टिप्लेक्स चेन या मोहिमेत सहभागी होत आहेत. मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (एमएआय) प्रमुख आणि पीव्हीआर आयनॉक्स पिक्चर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी कमल ज्ञानचंदानी यांनी जाहीर केले की, ‘एकूण ४००० स्क्रीनसह हा व्यापक उपक्रम असणार आहे, ज्या अंतर्गत चित्रपटाची तिकिटे प्रत्येकी ९९ रुपयांमध्ये उपलब्ध असतील. मात्र, रेक्लायनरसारखे प्रीमियम फॉरमॅट यातून वगळण्यात आले आहेत. तरी यातील ९० ते ९५ टक्के जागा ९९ रुपयांत मिळणार आहेत. अनेक सिंगल स्क्रीन्स थिएटर यात सहभागी होणार आहेत. अनेक सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये ९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत तिकिटे दिली जाणार आहेत. अवघ्या ७० रुपयांमध्ये देखील ही तिकिटे मिळू शकतात.’
ज्ञानचंदानी यांना म्हटले की, 'या ऑफरमुळे चित्रपटगृहांमध्ये नक्कीच गर्दी जमू शकते. उन्हाळ्याच्या सुट्टीचा हा हंगाम फायद्याचा ठरेल. हे फक्त एका दिवसासाठी आहे आणि त्यामुळे एकूण बॉक्स ऑफिसवर याचा फारसा फरक पडणार नाही, परंतु बॉक्स ऑफिसला चालना मिळेल. आमच्यासाठी हा एक नवीन सुट्टीचा हंगाम आहे आणि जूनपासून चित्रपटांची तारखांसाठीची धावपळ सुरू होईल. एप्रिल आणि मे महिन्यात निवडणुकीमुळे अनेक निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शित न केल्याने बरेच संघर्ष होण्याची शक्यता आहे.'
सिनेमाप्रेमी दिन २०२४ रोजी ९९ रुपयांच्या तिकीट ऑफरचा लाभ घेण्याची योजना तुम्ही आखतअसाल, तर तिकिटे बुक करणे सोपे आहे. जाणून घ्या कशा प्रकारे करावी तिकिटे बुक…
आपण बुकमाय शो आणि पेटीएम सारख्या थर्ड पार्टी वेबसाइटद्वारे आपली तिकिटे बुक करू शकता, जिथे ही ऑफर देखील उपलब्ध आहे.
प्रीमियम फॉर्मेट: या ऑफरमध्ये आयमॅक्स आणि रेक्लाइनर्स सारख्या प्रीमियम मूव्ही फॉरमॅटचा समावेश नाही. या फॉरमॅटसाठी तुम्हाला रेग्युलर तिकीट किंमत मोजावी लागणार आहे.
सुविधा शुल्क आणि जीएसटी: ९९ रुपयांच्या तिकीट किंमतीत सुविधा शुल्क किंवा जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) समाविष्ट नाही, जे सामान्यत: ऑनलाइन बुकिंगदरम्यान जोडले जातात. आपण वापरत असलेल्या प्लॅटफॉर्मवर अवलंबून हे अतिरिक्त शुल्क बदलू शकते.
संबंधित बातम्या