CID Season 2 : दया जिवंत असतानाही अभिजीत तुरुंगात का? 'सीआयडी २'च्या पहिल्या भागात उलगडलं रहस्य!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  CID Season 2 : दया जिवंत असतानाही अभिजीत तुरुंगात का? 'सीआयडी २'च्या पहिल्या भागात उलगडलं रहस्य!

CID Season 2 : दया जिवंत असतानाही अभिजीत तुरुंगात का? 'सीआयडी २'च्या पहिल्या भागात उलगडलं रहस्य!

Dec 22, 2024 12:31 PM IST

CID Season 2 New Episode : पहिल्या एपिसोडमध्ये दयाच्या एका छोट्याशा चुकीमुळे अभिजीतच्या मुलीच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याचे दाखवण्यात आले होते.

CID Season 2 New Episode
CID Season 2 New Episode

CID Season 2 New Episode : प्रेक्षकांचा आवडता शो 'सीआयडी' पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतला आहे. या शोचा दुसरा सीझन नुकताच सुरू झाला आहे. हा प्रसिद्ध क्राईम बेस्ड शो लोकांना इतका आवडला होता की, त्याने २० वर्षे लोकांच्या हृदयावर राज्य केले. हा शो १९९८मध्ये सुरू झाला होता आणि बराच काळ प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय राहिला होता. या मालिकेचा शेवटचा भाग २०१८ मध्ये आला होता, त्यानंतर आता ६ वर्षांनी या मालिकेने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर शानदार एन्ट्री केली आहे. पहिल्याच एपिसोडमध्ये दया आणि अभिजीतची एन्ट्री खूपच रोमांचक होती. पहिल्या एपिसोडमध्ये दयाच्या एका छोट्याशा चुकीमुळे अभिजीतच्या मुलीच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याचे दाखवण्यात आले होते.

अभिजीतचे लग्न कधी आणि कोणासोबत झाले?

'सीआयडी'च्या शेवटच्या एपिसोडमध्येही अभिजीतचे लग्न कोणासोबत होते, हे दाखवण्यात आले नव्हते. मात्र, त्याचे आणि डॉ. तारिकाचे अफेअर खूप चर्चेत होते. आता ६ वर्षांनंतर जेव्हा हा शो परत टीव्हीवर आला, तेव्हा तो एका मुलीचा बाप झाल्याचे समोर आले होते. आता त्याच्या जीवालाही धोका निर्माण आहे, त्याचेही कोणीतरी अपहरण केले आहे. श्रेयाच्या म्हणजेच अभिजीतची मुलीच्या अंगावर टाईम बॉम्ब बांधला आहे.

CID Season 2 : ‘सीआयडी सीझन २’चा मुहूर्त ठरला! कधी आणि कुठे पाहता येणार ही गाजलेली मालिका? जाणून घ्या...

दयामुळे अभिजीतच्या मुलीला आपला जीव गमवावा लागतो, असे या शोमध्ये दाखवण्यात आले आहे. मात्र, तिचा मृत्यू झाला की, नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कारण तो सीन तिथेच थांबवण्यात आला आहे. पण, आता अभिजीत देखील तुरुंगात पोहोचला आहे आणि त्याच्यावर दयाच्या खुनाच्या आरोप लावण्यात आला आहे. हे बघून सगळ्या प्रेक्षकांना धक्का बसला होता. इतकंच नाही तर, आता दया शोमध्ये दिसणार नाही की नाही हा सस्पेन्स देखील आहे.

एसीपींची स्टाईलही बदलली!

यावेळी एसीपी प्रद्युम्नच्या स्टाईलमध्ये देखील काहीसा बदल झाल्याचे शोमध्ये दाखवण्यात आले होते. याआधी प्रत्येक केसमध्ये एसीपी सगळ्यात आधी तिथे पोहोचायचे. मात्र, गेल्या काही काळात ते कुठेच आणि कोणत्याच केसमध्ये दिसलेले नाहीत. अशा परिस्थितीत सीआयडी टीममधील सदस्यांच्या मनात त्याच्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पण सिंह हा जंगलाचा राज असतो, मग तो लपून कसा राहणार? याच म्हणी प्रमाणे आता एसीपी प्रद्युम्न सगळ्यांसामोर येणार आहेत. ते एक केस संदर्भात सगळ्या डिटेल्स घेऊन सगळ्यांसामोर येणार आहे.

Whats_app_banner