CID Season 2 : ‘सीआयडी सीझन २’चा मुहूर्त ठरला! कधी आणि कुठे पाहता येणार ही गाजलेली मालिका? जाणून घ्या...
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  CID Season 2 : ‘सीआयडी सीझन २’चा मुहूर्त ठरला! कधी आणि कुठे पाहता येणार ही गाजलेली मालिका? जाणून घ्या...

CID Season 2 : ‘सीआयडी सीझन २’चा मुहूर्त ठरला! कधी आणि कुठे पाहता येणार ही गाजलेली मालिका? जाणून घ्या...

Nov 23, 2024 06:06 PM IST

CID Seaon 2 Start Date : ‘सीआयडी’च्या दुसऱ्या सीझनची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये दुसऱ्या सीझनविषयीची उत्सुकता वाढली आहे. आता या सीझनचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोसोबत सीझन २ च्या प्रीमिअरची माहितीही समोर आली आहे.

सीआईडी सीजन 2
सीआईडी सीजन 2

CID Season 2 Start Date : सोनी टीव्हीवरील ‘सीआयडी’ या मालिकेने २० वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले. २०१८ साली या मालिकेचा शेवटचा भाग टेलिकास्ट झाला होता. दरम्यान, गेल्या महिन्यात या लोकप्रिय मालिकेच्या दुसऱ्या सीझनची घोषणा करण्यात आली होती. सीझन २ ची घोषणा होताच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. नव्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या सीझनचा नवा प्रोमो समोर आला आहे. प्रोमोसोबत सीझन २च्या प्रीमिअरची माहितीही समोर आली आहे. जाणून घेऊया प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेचा सीझन २ कधी सुरू होत आहे.

सीआयडीचा दुसरा सीझन कधी येणार?

सोनी टीव्हीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सीझन २ चा नवा प्रोमो जारी केला आहे. हा प्रोमो पोस्ट करण्यासोबत कॅप्शन लिहिलं होतं- ‘गुन्हेगारांनी कितीही दरवाजे बंद केले तरी दया सोडणार नाही.’ यासोबतच २१ डिसेंबरपासून सीझन २ सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. 'सीआयडी सीझन २' ही मालिका येत्या २१ डिसेंबरपासून सोनी टीव्हीवर दर शनिवार आणि रविवारी रात्री १० वाजता प्रसारित होईल.

शोचा नवा प्रोमो रिलीज झाला!

सोनी टीव्हीच्या प्रोमोमध्ये दयाची एन्ट्री दाखवण्यात आली आहे. दया आपल्या नेहमीच्या शैलीत दरवाजा तोडून आत घुसतो. प्रोमोमध्ये दया दुखापतग्रस्त झाल्याचे दिसत आहे. त्या दुखापतीनंतर तो पुनरागमन करत आहे. या प्रोमोवर प्रेक्षक आपला आनंद व्यक्त करत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘पहिला सीझनही २१ पासून सुरू झाला होता, आता हा सीझनही २१ पासून सुरू होत आहे’. तर आणखी एका युजरने लिहिले की, 'माझी आवडती मालिका सीआयडी.' तर तिसऱ्या युजरने लिहिलं, ‘वाह काय प्रोमो आहे.’

Dharmaveer 2 : एकनाथ शिंदे अन् महायुतीच्या विजयात ‘धर्मवीर २’ चित्रपटाचा किती वाटा? वाचा!

‘सीआयडी’चा पहिला झीझान २१ जानेवारी १९९८ रोजी सुरू झाला. पहिल्या सीझनमध्ये एकूण १,५४७ भाग होते. या मालिकेत अभिजीतच्या भूमिकेत अभिनेता आदित्य श्रीवास्तव दिसला होता. एसीपी प्रद्युम्नच्या भूमिकेत शिवाजी साटम तर, दयाच्या भूमिकेत दयानंद शेट्टी दिसले होते. आता २१ डिसेंबर रोजी ही मालिका सोनी एंटरटेनमेंट चॅनलवर शनिवार व रविवार रात्री १० वाजता प्रसारित केली जाणार आहे. जेव्हा सीआयडीचा शेवटचा एपिसोड दाखवण्यात आला तेव्हा अभिजीत व दया यांना गोळी लागल्याचे दिसून आले होते. ते दोघंही दरीत कोसळले होते. आता त्यापुढे काय झालं? आपल्याला पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. 

Whats_app_banner