
बॉलिवूडचा बादशाह अर्थात अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे प्रचंड चर्चेत आहे. वर्षाच्या सुरुवातीला शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यापाठोपाठ त्याचा 'डंकी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील 'लूट पूट गया' हे गाणे प्रदर्शित झाले. या गाण्यावर क्रिकेटपटू ख्रिल गेलने डान्स केला आहे.
शाहरुख खान हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याने त्याच्या एक्स अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ख्रिस गेल लूट पूट गया गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने, "आणि युनिवर्स बॉसनं देखील डान्स केला. थँक्यू माय मॅन, आपण लवकरच भेटूयात आणि एकत्र लूट पूट गया या गाण्यावर डान्स करूयात" असे कॅप्शन दिले आहे.
वाचा: सिद्धार्थ 'सिंघम' टीममध्ये सहभागी! 'इंडियन पुलिस फोर्स'चा टीझर प्रदर्शित
डंकी हा चित्रपट अमेरिकेतील ३२० ठिकाणी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे ९१५ शो लावण्यात आले आहेत. या शोंचे जवळपास ५४०० तिकिटे विकली गेली आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाला ११ दिवस बाकी असताना चित्रपटाने ६२ लाख रुपयांची कमाई केली आहे. अमेरिकेत हा चित्रपट २१ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे शाहरुखच्या चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.
डंकी या चित्रपटाबाबत अभिनेते बोमन ईराणी यांनी वक्तव्य केले होते. 'डंकी या चित्रपटाची कथा ही एकदम हटके आहे. राजकुमार हिराणीचे चित्रपट जितके आकर्षक असतात त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. तुम्हाला चित्रपट पाहाताना मजा देखील येईल आणि नव्या गोष्टी शिकायला मिळतील' असे बोमन ईराणी म्हणाले होते.
संबंधित बातम्या
