chota pudhari ghanshyam darwade out of bigg boss : बिग बॉसच्या घरातून मोठी अपडेट आली आहे. बिग बॉस मराठीच्या घरी एलिमेशनचा टास्क आज पार पडणार होता. त्यामुळे घरातून कोण बाहेर पडणार? आणि कुणाला गणपती पावणार याकडे सर्वांच्या नजरा लागून होत्या. अखेर, या बाबत मोठी अपडेट बाहेर आली आहे. छोटा पुढारी अशी ओळख असलेल्या घन:श्याम दरवडे याला ‘बिग बॉस मराठी’ने नारळ दिल असून त्याला घरातून बाहेर काढण्यात आले आहे. घरामधून बाहेर पडला आहे. त्याचा प्रवास सहा आठवड्यातच संपला आहे. या बाबत त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून माहिती दिली आहे. जाता जाता त्याने अनेकांची पोल खोल केली आहे. तर त्याने जाता जाता सुरजला पाठिंबा दिला आहे.
बिग बॉस मराठीमधील सहावा आठवडा सुरु झालाय. या सहाव्या आठवड्यात छोटा पुढारीम्हणून ओळख असणाऱ्या घन:श्याम दरवडेला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. या आठवड्यात एकूण सात जण नॉमिनेशनमध्ये होते. यात घन:श्याम सोबत आणखी सात सदस्यांवर बाहेर जाण्याची टांगती तलवार होती. घनश्याम दरोडेसह, आर्या जाधव, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, निक्की तांबोळी, अरबाज पटेल आणि अभिजीत सावंत हे सात सदस्य या आठवड्यात नॉमिनेट होते. त्यापैकी घनःश्याम दरवडेचा बिग बॉसमधील प्रवास आज संपला.
छोटा पुढारी अर्थात घनःश्याम दरवडे हा त्याच्या बोलण्याच्या खास शैलीमुळे प्रसिद्ध आहे. त्याने बिग बॉसच्या घरात सहा आठवडे मोठी धम्माल केली आहे. त्याच्या खेळीमुळे त्याने अवघ्या राज्यातील प्रेक्षकांची मने जिंकली होती. सुर्वतीच्या दोन आठवडे घन:श्याम चांगला खेळला. या साठी सर्वांनी त्याचे कौतुक देखील केले. ऐवढेच नाही तर रितेश देशमुखने देखील त्यांच कौतुक केलं होत. त्यामुळे घनःश्याम सर्वांना लंबी रेस का घोडा वाटत होता. मात्र, त्याच्या खेळ तिसऱ्या आठवड्यापासून बिघडायला लागला. त्याने अनेकदा पॅडी, धनंजय पोवार व अंकिता वालावलकर यांना उलट उत्तर दिली. त्यामुळे सर्वांना छोट्या पुढारी असलेल्या घन:श्यामचा राग आला होता. तसेच त्याने भाऊच्या धक्क्यावर टास्क खेळायला देखील नकार दिल्याने रितेश देशमुख देखील त्याच्यावर नाराज होता. गर्दी जमवणारा, सभा गाजवणारा, व्यासपीठावरुन भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या छोट्या पुढारीची अनेक बिग बॉसचया घरातील अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
घन:श्याम हा रोखठोक मत मांडणारा आहे. त्यानं मोठमोठ्या नेत्यांना चॅलेंज देखील दिलं आहे. त्यामुळं त्यांची ओळख ही छोटा पुढारी अशी झाली होती. त्याने त्याचा हा तोरा कायम ठेवत ‘बिग बॉस मराठी’च्या घराचा निरोप घेताना देखील रोख ठोक म्हणणं मांडलं आहे. तो म्हणाला, “टास्क आहे.. खेळ हा खेळ असतो. मी टास्कमध्ये, खेळामध्ये हरलो असलो तरी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एक माणूस म्हणून चांगलं जगण्याचा मी प्रयत्न केला आहे. चांगला माणूस कसा असावा हे बिग बॉस मराठीच्या घरामधून दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. इथे डोक्याने गेम चालतो आणि मी माझ्या मनाने गेम खेळलो आहे. माणसं जोडली, माणसांना मी माणसांप्रमाणे वागवत होतो पण लोकांनी डोक्यात ठेऊन गेम केला. माझा गेम कुठे चुकला, कुठे पलटला असं मला वाटत नाही. पण बिग बॉसच्या घरात दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं हे मला कळलं आहे.