Chiranjeevi Viral Video: साऊथचा मेगास्टार चिरंजीवी नुकताच आपल्या कुटुंबासह पॅरिसमध्ये होता. त्याने ऑलिम्पिक सोहळ्यामधून काही फोटोही शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्याच्या कुटुंबाव्यतिरिक्त बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू देखील त्याच्यासोबत उपस्थित होती. पीव्ही सिंधूला प्रोत्साहन देण्यासाठी संपूर्ण कुटुंब तिथे पोहोचले होते. यादरम्यान सिंधूने चिरंजीवी काकांनी सरप्राईज दिल्याबद्दल त्यांचे आभारही मानले होते. एकीकडे सोशल मीडियावर ऑलिम्पिकचे हे फोटो आहेत, तर दुसरीकडे साऊथचा मेगास्टार चिरंजीवीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो विमानतळावर दिसला आहे. त्याच्या आजूबाजूला एअरलाईनचे अनेक कर्मचारी आहेत, जे त्याच्यासोबत चालताना दिसत आहेत. पण, पुढे जे घडते त्यामुळे लोकांना प्रचंड राग येतो.
चिरंजीवी त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत पॅरिसमध्ये दिसले होते. मात्र, आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये ते एकटेच विमानतळावर दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये ते सेल्फी घेण्यासाठी आलेल्या चाहत्याला हटवण्याचा प्रयत्न करताना दिसले आहेत. मात्र, अनेकदा साऊथ स्टार्सबाबतच असे व्हिडीओ समोर आले आहेत. आता या व्हिडीओवर लोक नाराजी व्यक्त करत आहेत. त्यांचे हे कृत्य अतिशय चुकीचे असल्याचे चाहते म्हणत आहेत.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये चिरंजीवीच्या आजूबाजूला विमान कंपनीचे अनेक लोक दिसतात. इतक्यात अचानक एका चाहत्याने मागून येऊन खिशातून फोन काढला आणि त्यांच्या दिशेने सरकला. तो चाहता चिरंजीवीसमोर पोहोचला. या चाहत्याने चिरंजीवीच्या जवळ पोहोचून सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, यादरम्यान चिरंजीवी त्याला हाताने ढकलून पुढे सरकला. सोशल मीडिया यूजर्स हा व्हिडीओ खूप शेअर आणि व्हायरल करत आहेत. या व्हिडीओवर चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. अनेक जण अभिनेत्याला खूप ट्रोल करत आहेत. ‘ही योग्य पद्धत नाही’, ‘हे अतिशय असभ्य वागणं आहे’ असे नेटकरी म्हणत आहेत.
दुसरीकडे, चिरंजीवीचे चाहते हा व्हिडीओ शेअर करणाऱ्यांवर संताप व्यक्त करत आहेत. चाहते म्हणत आहेत की, ‘संपूर्ण व्हिडीओ न पाहता कोणीही असे म्हणणे चुकीचे आहे.’ आणखी एका चाहत्याने कमेंट करत म्हटले की, ’साऊथचा मेगास्टार चिरंजीवीचे वागणे सर्वांनाच माहीत आहे, त्याला उगाच एवढा मोठा अभिनेता म्हटले जात नाही…’ हे असं कृत्य घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. नुकतेच नागार्जुनलाही याच कारणावरून ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते. अभिनेत्याच्या अंगरक्षकाने एका अपंग चाहत्याला ढकलले होते. यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर बरीच टीका झाली, त्यानंतर नागार्जुनने एक पोस्ट लिहून आपली चूक मान्य केली आणि माफी मागितली होती.
संबंधित बातम्या