पद्मिनी कोल्हापुरे आणि सचिन खेडेकर स्टारर 'चिमणी पाखरं' हा चित्रपट नक्कीच तुम्हाला आठवत असेल. २००१ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळाली होती. पद्मिनी कोल्हापुरे आणि सचिन खेडेकर यांच्यासह बाळ धुरी, विजय चव्हाण, लक्ष्मीकांत बेर्डे, तुषार दळवी या सारख्या कलाकारांनी चित्रपटात महत्वाच्या भूमिका बजावल्या होत्या. या कलाकारांसोबत चार बालकलाकार चित्रपटात झळकले होते. भारती चाटे, अविनाश चाटे, मेघना चाटे आणि निहार शेंबेकर. या बालकलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेकक्षकांची मने जिंकली होती. या मुलांपैकी भारती चाटे हिने चित्रपटात थोरल्या मुलीची भूमिका वठवली होती. मात्र सुंदर अभिनय करूनसुद्धा भारती पुढे कुठे दिसली नाही.
'चिमणी पाखरं' प्रदर्शित होऊन आता जवळजवळ २४ वर्षांचा काळ लोटला आहे. 'चिमणी पाखरं'च दिग्दर्शन चित्रपट महेश कोठारे यांनी केल होत, तर प्रख्यात 'चाटे कोचिंग क्लासेस'चे मालक मच्छिंद्र चाटे याचे निर्माते होते. भारती चाटे ही मच्छिंद्र चाटे यांचीच कन्या आहे. 'चिमणी पाखरं' हा भारतीने अभिनय केलेला पहिला चित्रपट होता. यानंतर ती चित्रपटात दिसली नाही. पण ती कला क्षेत्रातच अॅक्टिव आहे.
भारती चाटेने आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने लंडनमध्ये इंटरनॅशनल बिजनेसमधून एमबीए केले आहे. मॅनेजिंग प्रॉडक्शन, चित्रपट दिग्दर्शन, स्टोरी टेलिंग या विषयात तब्बल ९ वर्षांचा तिचा दांडगा अनुभव आहे. सुरुवातीला तिने माय मराठी या स्टेज शोची धुरा सांभाळली होती. ‘कोठारे व्हिजन’ मध्ये तिने एक वर्ष असिस्टंट डायरेक्टर म्हणूनही काम पाहिले आहे.
भारती आता विवाहित असून एका गोंडस मुलीची आई आहे. आशिष नाटेकर हे तिच्या नवऱ्याचे नाव असून सायशा मुलीचे नाव आहे. लग्नानंतर भारतीने 'तू का पाटील' आणि 'मेनका उर्वशी' या चित्रपटांची सहनिर्मिती केली आहे.
वाचा: पदेशात स्थायिक झालेली माधुरी दीक्षित भारतात का परतली? अभिनेत्रीने पहिल्यांदाच केला खुलासा
भारती आणि आशिष यांनी त्यांच्या मुलीच्या नावावर ‘सायेशा इंटिग्रेटेड कम्युनिकेशन’ नावाने स्वतःची निर्मिती संस्था सुरु केली आहे. या संस्थेअंतर्गत अनेक चित्रपटांची निर्माती करण्यात येत आहे.