Exclusive: 'धर्मवीर २' चित्रपटामध्ये धुरळाच उडणार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पडद्यावर झळकणार?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Exclusive: 'धर्मवीर २' चित्रपटामध्ये धुरळाच उडणार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पडद्यावर झळकणार?

Exclusive: 'धर्मवीर २' चित्रपटामध्ये धुरळाच उडणार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पडद्यावर झळकणार?

Aarti Vilas Borade HT Marathi
Jul 19, 2024 08:29 PM IST

Dharmaveer 2: गेल्या काही दिवसांपासून 'धर्मवीर २' हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. आता या चित्रपटाबाबात मोठी माहिती समोर येत आहे.

Dharmaveer 2
Dharmaveer 2

गेल्या काही दिवसांपासून ‘धर्मवीर’ आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाची गोष्ट सांगणार ‘धर्मवीर २’ हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘धर्मवीर’ या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर निर्मात्यांनी ‘धर्मवीर २’ची घोषणा केली. त्यानंतर चित्रपटाचे प्रदर्शित झालेले टीझर आणि पोस्टर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारे आहेत. आता या चित्रपटाबाबत मोठी माहिती समोर येत आहे.

सूत्रांनी हिंदुस्तान टाइम्स मराठीला दिलेल्या माहितीनुसार, ‘धर्मवीर २’ या चित्रपटात कलाकारांसोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या भूमिकेविषयीची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, आता ‘धर्मवीर २’मध्ये एकनाथ शिंदे यांची एण्ट्री झाल्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत आणखी उत्सुकता ताणली गेली आहे. सर्वजण या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट आतुरतेने पाहात आहेत.

चित्रपटाच्या टीझरविषयी

काही दिवसांपूर्वी ‘धर्मवीर २’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. टीझरमध्ये क मुस्लिम महिला राखी बांधायला दिघे साहेबांकडे येते. साहेब तिला बुरखा काढायला सांगतात. तिने चेहरा दाखवताच तिला मारहाण झाल्याचं साहेबांना कळतं आणि ते संतापतात. राखी बांधायला राज्यभरातून आलेल्या समस्त बहिणींना घेऊन साहेब निघतात. त्याचवेळी खास शैलीत साहेब म्हणतात, 'ज्याच्या घरातली स्त्री दुःखी, त्याची बरबादी नक्की!' अंगावर काटा आणणाऱ्या या टीझरमधून साहेबांच्या हिंदुत्त्वाची एक झलक पाहायला मिळाली. आता २० जुलै रोजी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.
वाचा : घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेक बच्चनने असे काही केले की चाहत्यांमध्ये चिंत्तेचे वातावरण

चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख

‘धर्मवीर २’ हा चित्रपट येत्या ९ ऑगस्टला मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई, उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे. कथा,पटकथा,संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनीच निभावली असून कॅमेरामन म्हणून महेश लिमये यांनी काम पाहिले आहे.

‘धर्मवीर २’ चित्रपटाविषयी

काही दिवसांपूर्वीच ‘धर्मवीर २’ या चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले होते. ‘धर्मवीर २’च्या पोस्टरवर ‘साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट’ असा उल्लेख करण्यात आला आहे. धर्मवीर चित्रपटात दिघे साहेबांचे जीवनचरित्र दाखवल्यानंतर आता ‘धर्मवीर २’मध्ये हिंदुत्त्वाची गोष्ट कशी दाखवली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Whats_app_banner