छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. या शोमध्ये वेगवेगळे स्पर्धक सहभागी होताना दिसतात. काही दिवसांपूर्वी बिग बॉस हिंदीचा १६वा सिझन पार पडला होता. या सिझनमध्ये सहभागी झालेल्या एका स्पर्धकाला शोपूर्वी मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. स्वत: या स्पर्धकाने मानसिक त्रासातून जास असल्याचे सांगितले होते. तसेच जवळपास ४० दिवस मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्याचा देखील खुलासा केला. आता ही स्पर्धक आहे तरी कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
'मला झोप येत नव्हती. मला झोप येत नव्हती. माझं मन चंचल झालं होतं. रात्रीपण माझा मेंदू काम करायचा. मी फक्त पलंगावर पडून राहायचे, पण मला झोप लॉगची नाही. माझ्या मेंदूला विश्रांती मिळत नव्हती. माझ्या चेहऱ्यावर कधीच पिंपल्स नव्हते. पण या काळात पिंपल्स यायला सुरुवात झाली होती. मी योग्य आहार घेत होते. तरीही माझे वजन कमी होऊ लागले होते. २०२१मध्ये मला जाणवले की काही तरी गडबड आहे', असे निमरीत म्हणाली.
पुढे निमरीत म्हणाली की, 'मी स्त्रीरोगतज्ज्ञांना दाखवले. महिनाभर माझ्या चाचण्या झाल्या. डॉक्टरांनी मला सांगितले की मी शारीरिकदृष्ट्या ठीक आहे आणि मग त्यांनी मला मानसोपचारतज्ज्ञांकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यावेळी कोविड-19 ची दुसरी लाट सुरू होती, त्यामुळे रुग्णालयात बेड नव्हते. डॉक्टरांनी माझी अवस्था पाहिली तेव्हा त्यांनी मला सांगितले की, तुम्ही आत्ताच तुमच्या घरच्यांना फोन करा. ते ऐकून मी घाबरले होते.'
वाचा: 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाच्या ऑस्कर प्रवेशाचा दावा खोटा? FFIच्या अध्यक्षांनी सांगितले सत्य
या मुलाखतीमध्ये निमरीतने तिच्यावर ओढावलेल्या या कठीण काळाचा सामना कसा केला हे देखील सांगितले आहे. 'माझी प्रकृती अतिशय वाईट होती. बेड नसतानाही मला कसेबसे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आई आल्यावर मी तिला घेऊन परत दिल्लीला गेले. तिथल्या एका हॉस्पिटलच्या मेंटल वॉर्डमध्ये मला अॅडमिट करण्यात आले. मी तिथे ४० दिवस होते. मी थेरपी घेतली. मी औषधं घेतली आणि मग मला 'बिग बॉस'मध्ये जाण्याची संधी मिळाली' असा खुलासा निमरतने केला.