दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या ‘छिछोरे’ या चित्रपटात ॲसिडची भूमिका साकारणारा अभिनेता नवीन पोलिशेट्टीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात नवीन गंभीर जखमी झाला आहे. नवीनच्या टीमने याबाबत माहिती दिली आहे. सध्या नवीनवर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
नवीन सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी अमेरिकेला गेला होता. तिकडे दुचाकीवर फिरत असताना त्याचा भीषण अपघात झाला आहे. सध्या नवीनवर डल्लासमध्ये उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पाहायला मिळते.
वाचा: पाठकबाईंनी खरेदी केली नवी कार, सासऱ्यांना दिली भेट
नवीनच्या टीमने अपघाताविषयी माहिती देताना सांगितले की, “डल्लासमध्ये नवीन तिची बाईक घेऊन फिरत होता. त्यावेळी अचानक त्याचे नियंत्रण सुटले आणि बाईक घसरली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या हाताला दुखापत झाली असून हा फ्रँक्चर आहे. ही घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे. मात्र आम्हालाही त्याविषयीची माहिती नुकतीच मिळाली आहे. नवीनच्या हातावर सध्या उपचार सुरु आहेत. तो अमेरिकेतच त्याच्यावर उपचार घेत आहे.”
वाचा: 'नमस्कार वहिनी', फोटोग्राफर्सने आवाज देताच आलियाने दिली अशी प्रतिक्रिया
नवीनने २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘छिछोरे’ या चित्रपटात ॲसिड ही भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले. या चित्रपटात सुशांत आणि श्रद्धा कपूर हे महत्त्वाच्या भूमिकेत होते. गेल्या वर्षी नवीनचा तेलगु चित्रपट आला होता. या चित्रपटाचे नाव ‘मिस शेट्टी मिस्टर पोलिशेट्टी’ असे आहे. महेश बाबू पचिगोला दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. दोन एनआरआयची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली होती. चित्रपटात नवीनसोबत अनुष्का शेट्टी मुख्य भूमिकेत दिसली होती. चित्रपटाने जवळपास ४६ कोटी रुपये कमावले. नवीन पोलिशेट्टीचा ‘अनगानगा ओका राजू’ हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कल्याण शंकर दिग्दर्शित या चित्रपटात तो श्रीलीलासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.