Bardovi Trailer: छाया कदमच्या 'बारदोवी' चित्रपटाचा थरकाप उडवणारा ट्रेलर प्रदर्शित
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bardovi Trailer: छाया कदमच्या 'बारदोवी' चित्रपटाचा थरकाप उडवणारा ट्रेलर प्रदर्शित

Bardovi Trailer: छाया कदमच्या 'बारदोवी' चित्रपटाचा थरकाप उडवणारा ट्रेलर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Jul 22, 2024 12:23 PM IST

Bardovi Trailer is Out: अभिनेत्री छाया कदम लवकरच 'बारदोवी' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

chhaya kadam
chhaya kadam

अभिनेत्री छाया कदम ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. तिने लापता लेडीज आणि मडगाव एक्सप्रेस या चित्रपटांमध्ये साकारलेली भूमिका विशेष गाजली. त्यानंतर कान्स फिल्म फेस्टीवलमध्ये छायाचा जलवा पाहायला मिळाला. आता छाया लवकरच 'बारदोवी' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

'बारदोवी' चित्रपटाच्या २ मिनिटे १३ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये तांत्रिक विद्येचा वापर करण्यात आला असल्याचे दिसत आहे. सतत बेपत्ता होणारी मुले आणि त्यांचा शोध घेणारे पोलीस दिसत आहेत. जसजसे कथानक पुढे जाते तसेतसे कथानक आणखी रंजक होते. चित्रपटाचा ट्रेलर एकंदरीत थरकाप उडवणारा आहे. चित्रपट पाहिल्यानंतर उलघडणार आहे. आता प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मानवी नातेसबंध, तांत्रिक, रहस्य, अतर्क्य घटना असलेल्या "बारदोवी" या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. या ट्रेलरने चित्रपटाविषयीची उत्कंठा वाढवली असून, कसलेले अभिनेते, गुंतवणारं कथानक असलेला हा चित्रपट २ ऑगस्ट रोजी भारतात सर्वत्र हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर मती गुंग करणारा आहे. चित्रपटाचं चित्रीकरण आणि व्हीएफएक्स उच्च दर्जाचे आहेत. त्यामुळे कसदार कथानकाला दमदार तांत्रिक बाजू, पार्श्वसंगीताची साथ असल्याचं ट्रेलरवरून दिसून येतं. म्हणूनच हा चित्रपट हिंदीतील वेगळा अनुभव देणारा ठरणार आहे. ट्रेलरमुळेच चित्रपटाविषयीची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
वाचा:मनोज बाजपेयीचा 'भैय्या जी' ओटीटीवर रिलीज होणार, जाणून घ्या कधी आणि कुठे

कोणते कलाकार दिसणार?

अमित जाधव, अर्जुन जाधव, प्रणित माणिक शिवाजी वायकर, संदीप बाबूराव काळे, एल्विन राजा 'बारदोवी' या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर छाया कदम सहनिर्मात्या आहेत. तर संतोष बळीराम तांबे, रवीराज शिवाजी वायकर, अभिजित सुमन वसंत पाटील, नितीन पाटील सहायक निर्माता आहेत. छाया कदम यांच्यासह चित्रपटात चित्तरंजन गिरी, विराट मडके यांच्यासारखे कसलेले कलावंत आहेत. तर विक्रम पाटील यांनी कॅमेरा, अरविंद मंगल यांनी प्रोडक्शन डिजाइन आणि विकास डीगे कार्यकारी निर्माता आहेत.

छाया कदमच्या कामाविषयी

अभिनेत्री छाया कदम यांचा सध्या हिंदी चित्रपटांमध्ये दमदबा पाहायला मिळतोय. ‘मडगाव’ एक्सप्रेस हा त्यांचा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. त्यापूर्वी ‘लापता लेडीज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. किरण रावच्या या चित्रपटात छायाने चांगली भूमिका साकारली होती. आता तिचा हा नवा ‘बारदेवी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

Whats_app_banner