अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने नुकतीच आगामी ९७ व्या अकादमी पुरस्कारासाठी १० श्रेणींमध्ये निवड झालेल्या चित्रपटांची यादी जाहीर केली. 'लापता लेडीज' हा चित्रपट भारताकडून ऑस्कर २०२४साठी निवडण्यात आला होता. पण आता हा सिनेमाची आंतरराष्ट्रीय फीचर फिल्मच्या यादीत निवड न झाल्यामुळे सर्वांना वाईट वाटत आहे. चित्रपटातील अभिनेत्री छाया कदम यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.
किरण रावच्या 'लापटा लेडीज' चित्रपटामध्ये मंजू माईची भूमिका साकारणारी मराठमोळी अभिनेत्री छाया कदम यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये नाराजी व्यक्त करत, ‘मी खरच अस्वस्थ आहे. आम्ही आमच्या चित्रपटासाठी खूप मोठ्या गोष्टींची कल्पना केली होती’ असे म्हटले. पुढच्या वर्षी भारतीय सिनेमा ऑस्करमध्ये स्थान मिळवेल असा सकारात्मक विचार करुन छाया म्हणाल्या, ‘पुढील वर्षी ऑस्करमध्ये भारत जिंकण्याची शक्यता आहे, अशी आशा मला आहे. ठीक आहे. आम्ही आमच्या आगामी सर्व चित्रपटांसाठी लढत राहू. आम्ही प्रयत्न करत राहू. पुढच्या वेळी आम्ही पुन्हा एकदा ऑस्करला जाऊ आणि स्पर्धेत खूप पुढे जाऊ.’
या मुलाखतीमध्ये छाया यांना, 'लापता लेडीज'च्या दिग्दर्शिका किरण राव यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी, 'प्रामाणिकपणे सांगायचे तर मला ती भेटली नाही. ती नुकतीच अमेरिकेहून भारतात परतली होती. जवळपास महिनाभर ती तिथे होती. काही दिवसांपूर्वी तिची भेट झाली आणि तिने ऑस्करसाठी सिनेमा गेल्याचे सांगितले. खरं तर आम्ही तीन दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात भेटलो होतो. आम्हाला खूप आनंद झाला. आम्हाला आशा होती की आम्ही स्पर्धेत खूप पुढे जाऊ. ऑल वी इमॅजिन इज लाईट या चित्रपटालाही ऑस्कर नामांकन मिळावे, अशी माझी इच्छा आहे' असे म्हटले.
वाचा: 'या' मराठमोळ्या मॉडेलच्या न्यूड पोजने ९०च्या दशकात उडवली होती खळबळ, १४ वर्षे चालला खटला
'लापता लेडीज' हा चित्रपट ऑस्कर २०२५ च्या शर्यतीतून बाहेर पडला असला, तरी गुनीत मोंगा यांच्या अनुजा या चित्रपटाची सर्वोत्कृष्ट लाइव्ह -अॅक्शन शॉर्ट फिल्म प्रकारात निवड झाली आहे. ऑस्करसाठी भारतीयांच्या आशा जिवंत राहिल्या आहेत. मोंगा यांचे ऑस्करमधील हे तिसरे नामांकन आहे. 'द एलिफंट व्हिस्परर्स अँड पीरियड : एंड ऑफ सेंटेंस' या तिच्या आधीच्या चित्रपटांनी ऑस्कर जिंकून भारतीय चित्रपटसृष्टीला नाव लौकिक मिळवून दिला होता.
संबंधित बातम्या