Chhatrapati Sambhaji: मुहूर्त मिळाला! अनेकदा लांबणीवर पडलेला 'छत्रपती संभाजी' चित्रपट ‘या’ दिवशी रिलीज होणार!-chhatrapati sambhaji marathi movie finally releasing on 2nd february 2024 in cinemas ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Chhatrapati Sambhaji: मुहूर्त मिळाला! अनेकदा लांबणीवर पडलेला 'छत्रपती संभाजी' चित्रपट ‘या’ दिवशी रिलीज होणार!

Chhatrapati Sambhaji: मुहूर्त मिळाला! अनेकदा लांबणीवर पडलेला 'छत्रपती संभाजी' चित्रपट ‘या’ दिवशी रिलीज होणार!

Feb 01, 2024 04:39 PM IST

Chhatrapati Sambhaji Marathi movie: या आधी ‘छत्रपती संभाजी’ हा चित्रपट २६ जानेवारीला रिलीज होणार होता. मात्र, पुन्हा त्याचे प्रदर्शन लांबणीवर ढकलण्यात आले होते.

Chhatrapati Sambhaji Marathi movie
Chhatrapati Sambhaji Marathi movie

Chhatrapati Sambhaji Marathi movie: छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आतापर्यंत अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा पराक्रम देखील अनेक चित्रपट आणि मालिकांमधून सगळ्यांनीच पाहिला आहे. दरम्यान, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा ‘छत्रपती संभाजी’ चित्रपट गेले कित्येक वर्षे रखडला होता. मात्र, आता अखेर या चित्रपटाला मुहूर्त मिळाला आहे. येत्या २ फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. या आधी हा चित्रपट २६ जानेवारीला रिलीज होणार होता. मात्र, पुन्हा त्याचे प्रदर्शन लांबणीवर ढकलण्यात आले होते.

छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाला, त्यांच्या बलिदानाला तोड नाही. स्वराज्याच्या इतिहासात शंभू राजांचा पराक्रम नेहमीच लक्षात ठेवला जाणार आहे. निधड्या छातीने संकटाला सामोरे जात, पराक्रमाच्या जोरावर मराठा साम्राज्याच्या विस्तार करण्याचा पराक्रम छत्रपती संभाजी महाराज यांनी केला. स्वराज्याच संरक्षण करणाऱ्या या पराक्रमी राजाचा जीवनपट उलगडणारा ‘छत्रपती संभाजी’ हा चित्रपट येत्या २ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. राकेश सुबेसिंह दुलगज यांनी या चित्रपटाची निर्मित आणि दिग्दर्शन केले आहे. ‘परफेक्ट प्लस एंटरटेनमेंट’ आणि ‘एजे मीडिया कॉर्प’ प्रस्तुत 'छत्रपती संभाजी' हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू आणि इंग्रजीमध्ये एकाच वेळी प्रदर्शित होत आहे.

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे अडकली लग्न बंधनात! शाही विवाहसोहळ्याचा थाट पाहिलात का?

‘शंभू’ महाराजांचा धगधगता इतिहास!

राजकारण, मुसद्देगिरी, समाजकारण, धर्मकारण यांच्यात मुरलेले छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याच्या रणांगणावरचे खरे ‘शेर’ होते. स्वराज्यनिष्ठा, शौर्य, धैर्य अशा अनेक अंगाने अनेक मोहिमा यशस्वी करणाऱ्या महाराजांनी निर्माण केलेला प्रेरणादायी इतिहास 'छत्रपती संभाजी' या चित्रपटातून तरुण पिढीला पाहता येणार आहे. राजकारणातील डावपेच, गनिमी कावा या जोरावर छत्रपती संभाजी महाराजांनी सलग नऊ वर्षे मुघल, आदिलशहा, सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज, आणि इतर अंतर्गत शत्रूंशी लढा देत, स्वराज्याला टिकवले आणि वाढवले.

दिग्गज कलाकार झळकणार!

दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अजोड पराक्रमाच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्या साम्राज्याचा विस्तार केला. प्रमोद पवार, शशांक उदापूरकर, रजित कपूर, दलीप ताहिल, मृणाल कुलकर्णी, मोहन जोशी, भरत दाभोळकर, लोकेश गुप्ते, बाळ धुरी, दिपक शिर्के, अमित देशमुख, कै. आनंद अभ्यंकर, समीर, मोहिनी पोतदार, प्रिया गमरे आदी कलाकार 'छत्रपती संभाजी' चित्रपटात आहेत. अविनाश विश्वजित, गुरु शर्मा आणि आरव यांचे संगीत चित्रपटाला लाभले असून पार्श्वसंगीत अमर-अमित देसाई यांनी दिले आहे. 'छत्रपती संभाजी' हा चित्रपट येत्या २ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.