मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  OTT Release: घरबसल्या बघता येणार मकरंद अनासपुरे यांचा ‘छापा काटा’ चित्रपट! कधी आणि कुठे? जाणून घ्या...

OTT Release: घरबसल्या बघता येणार मकरंद अनासपुरे यांचा ‘छापा काटा’ चित्रपट! कधी आणि कुठे? जाणून घ्या...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 15, 2024 03:15 PM IST

Chhapa Kata OTT Release: मकरंद अनासपुरे आणि तेजस्विनी लोणारी यांच्या जोडीला कायमच प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून, त्यांच्या विलक्षण जोडीचा हा सहावा चित्रपट आहे.

Chhapa Kata OTT Release
Chhapa Kata OTT Release

Chhapa Kata OTT Release: अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी आपल्या दमदार अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. नुकताच त्यांचा ‘छापा काटा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात मकरंद अनासपुरे यांच्यासोबत अभिनेत्री तेजस्विनी लोणारी मुख्य भूमिकेत झळकली होती. मकरंद अनासपुरे आणि तेजस्विनी लोणारी यांच्यासोबत या चित्रपटात मराठीतले अनेक तगडे कलाकार देखील झळकले होते. या चित्रपटाने थिएटरमध्ये चांगलाच कल्ला केला होता. आता त्यांचा हा चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या पाहण्याची संधी मिळणार आहे.

मकरंद अनासपुरे आणि तेजस्विनी लोणारी यांच्या ‘छापा काटा’ चित्रपटाचा १९ जानेवारी २०२४ रोजी ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार असून, रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा या चित्रपटाच्या मनोरंजनाचा विलक्षण अनुभव मिळणार आहे. मकरंद अनासपुरे आणि तेजस्विनी लोणारी यांच्या जोडीला कायमच प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून, त्यांच्या विलक्षण जोडीचा हा सहावा चित्रपट आहे.

Viral Video: पत्नीसमोरच ‘जेठालाल’ला विचारलं बबिता कुठे आहे? अभिनेत्याच्या उत्तरानं पिकला हशा!

लोकांना वेड्यात काढून पॉलिसी विकणाऱ्या करामती नाम्याची गोष्ट या चित्रपट बघायला मिळणार आहे. नाम्या बहिणीच्या लग्नासाठी श्रीमंत शनयाशी लग्नाचा करार करतो. पण, हा नकली लग्नाचा करार नाम्या आणि शनायाच्या कुटुंबात चांगलीच तारांबळ उडवतो. पुढे नाम्याच्या आयुष्यात हा करार काय धमाल विनोदी गोंधळ घालणार आणि त्या कराराचं पुढे काय होणार, हे चित्रपटात पहायला मिळणार आहे. या चित्रपटात ‘नाम्या’ची भूमिका मकरंद अनासपुरे आणि श्रीमंत मुलीची भूमिका अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांनी केली आहे. मोहन जोशी, अरुण नलावडे, ऋतुराज फडके, पंकज विष्णु, सुश्रृत मंकणी, रीना अग्रवाल आणि विजय पाटकर या सुप्रसिद्ध अभिनेत्यांच्या विनोदाची डबल धमाल चित्रपटात पहायला मिळणार आहे.

‘छापा काटा’ या चित्रपटाची निर्मिती सुशीलकुमार अग्रवाल यांनी केली असून, पटकथा आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केली आहे. अभय जोधपुरकर, आर्या आंबेकर, सुनिधि चौहान आणि आदर्श शिंदे यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजातील गीतांने प्रेम, भावना आणि उत्साहाचा जबरदस्त संगम जुळून आला आहे. चित्रपटातील या सुमधुर गीतांना सुप्रसिद्ध संगीतकार मुकेश काशीकर आणि गौरव चाटी यांनी आपल्या संगीत कौशल्याने संगीतबद्ध असून, गाण्यांना रसिक प्रेक्षकांचा संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.

WhatsApp channel