Chhaava Box Office Collection Weekend : बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या वीकेंडला या चित्रपटाने १०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. रिपोर्ट्सनुसार, रिलीजच्या पहिल्या रविवारी या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. रविवारी या चित्रपटाने जवळपास ५० कोटींची कमाई केली आहे. विकी कौशलचा हा चित्रपट १४ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, विकी कौशलच्या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी जवळपास ४९.५० कोटींची कमाई केली आहे. तर, दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी या चित्रपटाने ३७ कोटींची कमाई केली होती. तर, शुक्रवारी या चित्रपटाने ३१ कोटींची कमाई केली आहे. अशा प्रकारे या चित्रपटाने आतापर्यंत ११७.५० कोटींची कमाई केली आहे.
विकी कौशलचा हा चित्रपट लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. तर, मॅडॉक फिल्म्सने विकी कौशलचा चित्रपट रिलीज केला आहे. या चित्रपटात अभिनेता विक्की कौशल याने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात विकी कौशलसोबत रश्मिका मंदाना महत्त्वाची भूमिका साकारताना दिसली आहे.
विकी कौशलच्या ‘छावा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. विकी कौशलने आज आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. त्याने पोस्टमध्ये लिहिले की, ‘सर्वांचे प्रेम पाहून माझे मन खूप आनंदी झाले आहे - खूप खूप धन्यवाद.’ तर विकी कौशलने त्याच्या इन्स्टाग्रामवर आणखी अनेक किस्से शेअर केले आहेत, ज्यात त्याने प्रेक्षकांना हा चित्रपट कसा आवडला, हे सांगितले आहे. तर, त्याने अनेक व्हिडिओ देखील शेअर केले आहेत.
संबंधित बातम्या