Chetan Kumar Arrested : साऊथ अभिनेता चेतन कुमार त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चेतन कुमार याने नुकत्याच एका ट्विटमध्ये हिंदुत्वावर टीका केली होती. त्यानंतर बजरंग दलाच्या नेत्याने त्यांच्याविरोधात पुलीममध्ये तक्रार दाखल केली होती. आता चेतन कुमारचे ट्विट व्हायरल झाल्यानंतर बंगळुरूमधील शेषाद्रिपुरम पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
चेतन कुमार याने सोमवारी एक ट्विट केले. ज्यात त्याने लिहिले होते की, 'हिंदुत्व हे खोटेपणावर आधारित होते'. अभिनेत्याचे हे ट्विट काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर आता चेतन कुमारला शेषाद्रिपुरम पोलिसांनी बंगळुरूमधून अटक केली आहे.
कन्नड अभिनेता चेतन कुमार याने ट्विट करून 'हिंदुत्व खोट्यावर आधारित आहे' असे म्हटले होते. चेतन कुमार याने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, 'रामाने रावणाचा पराभव केला आणि अयोध्येला परतले > एक खोटे. १९९२: बाबरी मशीद ही 'रामाची जन्मभूमी' -> एक खोटे, २०२३: उरीगौडा-नांजेगौडा हे टिपूचे 'खूनी' आहेत -> खोटे, हिंदुत्वाचा सत्याने पराभव केला जाऊ शकतो -> सत्य म्हणजे समानता'.
चेतनच्या या ट्विटचा हिंदू संघटनांनी तीव्र निषेध केला आहे. बजरंग दलाने आपला विरोध व्यक्त करत, हा हिंदू धर्माचा अपमान असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे बजरंग दलाचे नेते शिवकुमार यांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. त्यानंतर चेतन कुमारला अटक करण्यात आली आहे. चेतन कुमार याने यापूर्वीही अनेकवेळा धर्माबाबत वादग्रस्त विधाने केली होती. यापूर्वी चेतन कुमार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. चेतन कुमार याने ‘कांतारा’ या चित्रपटावर देखील चेतनने अशीच टीका केली होती. त्यावेळी देखील अभिनेत्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला गेला होता. त्यावेळी चेतन कुमार याने ‘कांतारा’ चित्रपटातील ‘भूता कोला’ धार्मिक प्रथेविरोधात भाष्य केले होते.
संबंधित बातम्या