छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कुकिंग शो म्हणून 'मास्टर शेफ इंडिया' पाहिला जातो. या शोमध्ये सर्व सामान्य लोक सहभागी होऊन उत्तम पदार्थ बनवत परिक्षकांची मने जिंकतात. २०१० साली मास्टर शेफ इंडियाचा पहिला सिझन आला होता. या पहिल्या सिझनसाठी परीक्षक म्हणून बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमारची निवड करण्यात आली होती. त्यासोबत प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांची देखील निवड करण्यात आली होती. मात्र, संजीव कपूर यांच्या एका अटीमुळे त्यांना शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.
नुकताच संजीव कपूर यांनी सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने मास्टर शेफ इंडियाच्या वेळी घडलेला किस्सा सांगितला. 'जेव्हा मास्टर शेफ हा शो आला त्यापूर्वी आम्ही एक कुकिंग शो केला होता. त्यामुळे आम्हाला या शोचे भविष्य माहिती होते. मला या शोसाठी विचारणा करण्यात आली. जेव्हा आमचे बोलणे सुरु होते तेव्हा मला कळाले की शोसाठी एका परिक्षकाची निवड करण्यात आली आहे. मला असे सांगण्यात आले होते की संजीव कूपर म्हणजे माझ्यापेक्षा कोणताही मोठा शेफ नाही. १० सोडा टॉप १००मध्येही कोणी नाही. त्यामुळे त्यांनी अक्षय कुमारला साईन केले. तो माझा चांगला मित्र, हुशार माणूस, उत्तम व्यक्तीमत्त्व असलेला माणूस आहे' असे संजीव कपूर म्हणाले.
पुढे ते म्हणाले, 'आम्ही अक्षय कुमारला साईन केले आहे. त्यामुळे आम्ही तुम्हालाही साईन करु इच्छितो. त्यावर मी म्हटले अरे वाह. मला खूप आनंद आहे पण माझी एक अट आहे. तुम्ही अक्षय कुमारला कितीही पैसे द्या. मला त्याच्यापेक्षा एक रुपया जास्त हवा. त्यांनी मला प्रश्न विचारला की तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त पैसे हवेत? मी त्यावर उत्तर दिले हो. कारण हे माझे क्षेत्र आहे. ते ऐकून त्यांना धक्का बसला. त्यांना ते मान्य नव्हते आणि मी माझ्या मतावर ठाम होतो. त्यांनी पुन्हा मला फोन केला. त्यांनी अक्षय कुमारला रिप्लेस करायचा निर्णय घेतला. मी हा शो माझ्या अटींवर साईन केला.'
वाचा: पुढच्या वर्षी अभिनेत्री सायली संजीव करणार लग्न? रक्षाबंधनानिमित्त शेअर केलेल्या व्हिडीओची चर्चा
मास्टरशेफ इंडियाचे आतापर्यंत आठ सिझन झाले आहेत. संजीव कपूर या शोच्या दुसऱ्या सिझनमध्ये काम करु लागले. त्यांनी चार सिझन केले. त्यानंतर काही शेफ आले आणि त्यांनीही नंतर तो शो सोडला. त्यांच्यामधील विकास खन्ना आणि रणवीर ब्रार हे सर्वाधिक काळ टिकलेले परीक्षक होते.