प्रत्येक गावात एक तरी चौक असतोच. गावातील अनेक गोष्टींचा, घटनांचा, नात्यांचा हा चौक नेहमीच साक्षीदार असतो. असाच जिवाभावाची मैत्री, राजकारण यावर भाष्य करणारा ‘चौक’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई केली होती. आता हा चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या पाहाता येणार आहे. जाणून घ्या कधी आणि कुठे?
‘चौक’ या अॅक्शन ड्रामाने परिपूर्ण चित्रपटात अभिनेता किरण गायकवाड पहिल्यांदाच कधीही न पाहिलेल्या अशा जबरदस्त भूमिकेत दिसणार आहे. देवेंद्र गायकवाड यांनी या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. या चित्रपटात प्रवीण तरडे, किरण गायकवाड, संस्कृती बालगुडे, उपेंद्र लिमये, अक्षय टांगसाळे , अरित्र गायकवाड, स्नेहल तरडे या कलाकारांची मोठी फौज पाहायला मिळत आहे.
वाचा: बिग बॉस फेम वीणा जगतापचे छोट्या पडद्यावर पुनरागमन, 'या' मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार
राजकारणावर भाष्य करणारा 'चौक' हा चित्रपट येत्या १२ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट झी टॉकीज वाहिनीवर दुपारी १२ वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मे महिन्याची सुट्टी, आंब्याचा सिझन आणि त्यात मनोरंजनाने खचाखच भरलेल्या चौक या सिनेमाचा प्रीमियर म्हणजे प्रेक्षकांसाठी सुखद अनुभव असणार आहे.
वाचा: 'तुला पाहाते रे'नंतर सुबोध भावेचे पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन, नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित
प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आलेल्या 'चौक' या सिनेमाने प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणण्यात बाजी मारली होती. तरुणाई, राजकारण, वाद, सुडाची भावना हे विषय या सिनेमात अतिशय प्रभावीपणे मांडण्यात आले आहेत. प्रवीण तरडे आणि उपेंद्र लिमये यांचे दमदार आणि अर्थपूर्ण संवाद ही देखील या सिनेमाची वेगळी ओळख नक्कीच म्हणता येईल. गेल्या काही वर्षात मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सामाजिक, वास्तववादी कथा साकारल्या जात आहेत. त्यात चौक या सिनेमाचा उल्लेख आवर्जुन करता येईल.
वाचा: ती परत येतेय... ; तब्बल ९ वर्षांनंतर अभिनेत्री शिवानी सुर्वे दिसणार 'या' मालिकेत