Cham Cham Paus: गाण्यातून बरसणार पावसाच्या सरी; अंकिता राऊत-हरीश वांगीकरचं ‘छम छम पाऊस’ रिलीज!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Cham Cham Paus: गाण्यातून बरसणार पावसाच्या सरी; अंकिता राऊत-हरीश वांगीकरचं ‘छम छम पाऊस’ रिलीज!

Cham Cham Paus: गाण्यातून बरसणार पावसाच्या सरी; अंकिता राऊत-हरीश वांगीकरचं ‘छम छम पाऊस’ रिलीज!

Sep 04, 2023 12:44 PM IST

Cham Cham Paus Song Release: सगळेच पावसाची आतुरतेने वाट बघत आहेत. अशातच आता आपल्या दमदार सुरांनी आणि आर्टिफिशियल पावसाने रसिक प्रेक्षकांना चिंब करणारं नवं गाणं रिलीज करण्यात आलं आहे.

Cham Cham Paus Song Release
Cham Cham Paus Song Release

Cham Cham Paus Song Release: पावसाळा सुरू असला, तरी सध्या पावसाने मात्र चांगलीच दडी मारली आहे. ऐन पावसाळ्यात कडक उन पडल्याने सगळेच हैराण झाले आहेत. सगळेच पावसाची आतुरतेने वाट बघत आहेत. अशातच आता आपल्या दमदार सुरांनी आणि आर्टिफिशियल पावसाने रसिक प्रेक्षकांना चिंब करणारं नवं गाणं रिलीज करण्यात आलं आहे. कोळी गाण्यांची लोकप्रियता पुढे नेत अभिनेत्री अंकिता राऊत आणि ‘टक्सीडो’ फेम अभिनेता हरिश वांगीकर यांचे बहुप्रतिक्षित 'छम छम पाऊस' हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे.

या गाण्याबद्दल बोलताना संगीतकार, अभिनेता हरिश वांगीकर सांगतो की, ‘मी एकदा पाऊस बघत बघत गाणी ऐकत होतो. तेवढ्यात माझ्या प्लेलिस्टमध्ये एक गरब्याचं गाणं सुरू झालं आणि मला हे गाणं सुचलं. 'छम छम पाऊस' हे पावसावरील रोमँटिक गाणं आहे. आणि स्पेशली या गाण्याचं म्युझिक ट्रेडिशनली गरबा फॉर्ममध्ये आहे. तर या गाण्याचे बोल मराठी आहेत. माझा मित्र अविनाश पायाळ याने या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे. अविनाश आणि अंकितासोबत रिअर्सल करताना खूप धमाल आली. पण, शूटिंग करताना पावसात भिजून भिजून फार थंडी वाजत होती. या गाण्याला सोशल मीडियावर खूप प्रेम मिळतं आहे. ते पाहून खूप आनंद होत आहे.’

Sophie Turner: प्रियांका चोप्राचा दीर घटस्फोट घेणार; चार वर्षांचा सुखी संसार मोडणार!

अभिनेत्री अंकिता राऊत या शूटिंगचा किस्सा शेअर करताना म्हणाली की, ‘गाण्याची शूटिंग पुण्यातील एका सुंदर रिसॉर्टमध्ये होती. पहाटेचं शूट होतं. थोडा फार पाऊस पडला. आणि नंतर पाऊसच नव्हता. मग, आम्ही आर्टिफिशियल पावसाची मदत घेत संपूर्ण गाणं चित्रित केलं. खरंतर, आर्टिफिशियल पाऊस पडताना दाखवणं सोप्पं नाहीयं‌. पण, या गाण्याच्या टिमने फार मेहनत केली. रेन डान्स चालू केलेला म्हणून मी स्वताहूनच तिथे जाऊन नाचत होते. आणि मी काही व्हिडीओही शूट केले. आणि नंतर मला असं सांगण्यात आलं की, आता इथे गाण्यासाठीचे टेक घ्यायचेत. मग ते टेक्स घेताना माझ्या नाकातोंडात पाणी गेलं आणि भयानक थंडी वाजत होती. त्यामुळे थोडा ब्रेक घ्यावा लागला. मी आधीच मस्ती म्हणून स्वतःच जाऊन भिजलेले. अचानक लाईटसुद्धा गेली त्यामुळे पुन्हा शूट पुढे ढकललं गेलं. परंतु शूट करताना मला खूप मजा आली.’

विशेष म्हणजे या गाण्याचे संगीतकार, गीतकार आणि गायक हरिश वांगीकर असून, या गाण्याचे संगीत संयोजक मॅक्सवेल फर्नांडीस आहे. तर, गाण्याचे दिग्दर्शक कैलास पवार आहेत. हे गाणं अविनाश पायाळ याने कोरिओग्राफ केलं आहे. शिवाय प्रसन्नाचं रॅप साँग देखील यात आहे. यंदा पावसाचे दिवस असूनही, तितकासा पाऊस पडत नाहीय. म्हणून प्रथमच आर्टिफिशियल पावसात 'छम छम पाऊस' हे गाणं‌ शूट करण्यात आलं.

Whats_app_banner