छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणून 'चला हवा येऊ द्या' ओळखला जातो. या कार्यक्रमात सहभागी झालेले कलाकार, शोचा सूत्रसंचालक, परिक्षक, शोमध्ये हजेरी लावणारे कलाकार या सर्वांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. महाराष्ट्रातील कानकोऱ्यापतील प्रेक्षक हा शोचा चाहता आहे. आता ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात बच्चे कंपनीची धमाल पाहायला मिळणार आहे. त्यात भारत गणेशपुरे यांचा नातूही दिसणार आहे.
भारत गणेशपुरे हे शोच्या पहिल्या भागा पासून 'चला हवा येऊ द्या'चा भाग आहेत. या कार्यक्रमाने त्यांना नवी ओळख निर्माण करुन दिली आहे. आता याच शोच्या माध्यमातून त्यांचा नातू करिअरला सुरुवात करत आहे. तो छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे.
भारत यांच्या नातवाचे नाव अयांश कपिले असे आहे. त्याने नुकताच चला हवा येऊ द्याचे शुटिंग पूर्ण केले आहे. एका मुलाखतीमध्ये साडेचार वर्षांच्या आयानने म्हटले की, “माझी आत्या माझ्या बहिणीच्या लग्नात अमरावतीला आली होती तेव्हा तिने अयांशला पाहिले. तिने अयांशची मस्ती, त्याचे बोलणे, त्याचा डान्स पाहिला आणि तिला अयांशमध्ये टॅलेंट दिसले. माझे मामा भारत गणेशपुरेही ‘चला हवा येऊ द्या’मध्ये काम करीत आहेत. अशी अयांशची अभिनयाची सुरुवात झाली,” असे अयांशच्या आईने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तर “मुंबईमध्ये राहायला आणि शूटिंग करायला खूप मजा येते.”
‘चला हवा येऊ द्या- लहान तोंडी मोठा घास’ हे नवीन पर्व १५ मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पर्वात सर्वांची लाडकी मायरा वायकुळदेखील सहभागी होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना हे नवीन पर्व पाहताना मजा नक्की येणार.
संबंधित बातम्या