मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Chala Hawa Yeu Dya: या कारणामुळे 'चला हवा येऊ द्या' घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Chala Hawa Yeu Dya: या कारणामुळे 'चला हवा येऊ द्या' घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Aarti Vilas Borade HT Marathi
Oct 28, 2023 03:01 PM IST

Chala Hawa Yeu Dya: झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम सर्वांचा आवडता कार्यक्रम आहे. पण आता हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे समोर आले आहे.

Chala Hawa Yeu Dya
Chala Hawa Yeu Dya

झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडले आहे. आता हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. पण हा कार्यक्रम का प्रेक्षकांचा निरोप घेणार यामागचे कारण समोर आले आहे.

'चला हवा येऊ द्या' हा एक विनोदी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम (भालचंद्र कदम), सागर कारंडे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, स्नेहल शिदम हे सर्व विनोदवीर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले आहेत. २०१४ साली या कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. आता हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती निलेश साबळेने दिली होती.
वाचा: आधी पतीचा मृत्यू, मग मुलगा गेला; करिअरलाही उतरती कळा! आता काय करतात अनुराधा

निलेश साबळेने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांने सांगितले की, "चला हवा येउ द्या' कार्यक्रम थांबत असला तरीही प्रेक्षकांच्या मनात तो कायमस्वरूपी राहील. गेली नऊ वर्षे एक हजारहून अधिक भागांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन कार्यक्रमाने केले आहे. माझ्यासह संपूर्ण टीमला या कार्यक्रमाने नाव, ओळख, आर्थिक स्थिरता सर्व काही दिले. तूर्तास आपण थांबत आहोत, असे वाहिनीकडून सांगण्यात आले आहे. पण, पुन्हा सात-आठ महिन्यांनी नवे पर्व सुरू होऊ शकते."

ट्रेंडिंग न्यूज

'चला हवा येऊ द्या' आता बंद होणार असल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या कार्यक्रमाचे 'होऊ दे व्हायरल', 'सेलिब्रिटी पॅटर्न', 'लहान तोंडी मोठा घास' असे पर्व आपण पाहिले आहेत. आता हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

WhatsApp channel