Kushal Badrike Emotional Post : झी मराठी वाहिनीवरील ज्या कार्यक्रमाने प्रेक्षकांचे जवळपास १० वर्षे मनोरंजन केले, प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडले तो कार्यक्रम म्हणजे 'चला हवा येऊ द्या.' हा कार्यक्रम आता प्रेक्षकांचा निरोप घेण्यास सज्ज झाला आहे. त्यामुळे कार्यक्रमात महत्त्वाच्या भूमिकेत असणारा कलाकार कुशल बद्रिके भावूक झाला आहे. त्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.
कुशलने चला हवा येऊ द्या कार्यक्रमाच्या मंचावरचा एक व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. त्याला कुशलने निरोप घेतो आता आम्हां आज्ञा असावी हे गाणे टाकले आहे. तसेच या व्हिडिओला कुशलने दिलेल्या कॅप्शनने साऱ्यांचच लक्ष वेधून घेतलंय. माय बाप प्रेक्षकहो, सगळ्यांचे मनापासून आभार.“चूक भूल द्यावी घ्यावी”, असे कॅप्शन कुशलने या व्हिडिओला दिले आहे.
वाचा: अभिनेत्री तेजश्रीने गुपचूप उरकला साखरपुडा, शेअर केले फोटो
सलग १० वर्ष लोकांना हसवलं ज्यांनी, कसे आहात हसताय ना असे म्हणत फक्त महाराष्ट्रात नाही तर जगभरात लोकांचे मन जिंकले तो लोकप्रिय कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' आणि ती लाडकी टीम आता १७ मार्चपासून विश्रांती घेतेय, पण परत येण्यासाठी. कारण गेली १० वर्ष प्रेक्षकांच्या मनात घर करून असलेल्या 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रसारित झाला आहे. या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यामुळे सर्वजण नाराजी व्यक्त करत आहेत. हा कार्यक्रम पुन्हा कधी सुरु होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वाचा: अभिनेता नाही तर पत्रकार असता अभय देओल, या चित्रपटाने बदलले आयुष्य
'चला हवा येऊ द्या' ह्या रिऍलिटी शोबद्दल बोलताना झी मराठीच्या चीफ चॅनल ऑफिसर ‘व्ही.आर. हेमा’ म्हणाल्या, "चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाने मनोरंजनाचा स्तर एका वेगळ्या टप्यावर नेऊन ठेवला आहे. ह्या टीम मधल्या प्रत्येकानी लोकांच्या हृदयात आपलं घर निर्माण केले. वाहिनीसोबत असलेलं ह्यांचं नातं हे अलौकिक आहे. तुमच्या लाफ्टर डोसचा बुस्टर डोस घेऊन ही टीम तुमच्यासाठी नव्या जोमात परत येणारआहे".