छोट्या पडद्यावरील 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके. त्याच्या विनोदाच्या विनोदांनी अख्या महाराष्ट्राला खळखळून हसवले आहे. पण तुम्हाला माहिती आहे का एकेकाळी कुशलला लग्नासाठी सासरचे तयार नव्हते. त्यांची लव्हस्टोरी काय आहे चला जाणून घेऊया.
कुशलच्या पत्नीचे नाव सुनैना असे आहे. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असल्यापासून ते एकमेकांना ओळखत होते. दोघे एकत्र नाटकांमध्ये काम करायचे, डान्सच्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचे. कॉलेज संपल्यावर त्यांच्यामधील संपर्क तुटला होता. मात्र एक वेळ अशी आली की त्यांना पुन्हा एकत्र काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या मैत्रिचे हळूहळू प्रेमात रुपांतर होत गेले. विशेष म्हणजे बऱ्याच दिवसांनी त्यांनी ज्या प्रोजेक्टसाठी काम केले त्या प्रोजेक्टमध्ये सुनैना ही त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसत होती. त्यांच्या भेटीगाठी हळूहळू वाढू लागल्या होत्या.
वाचा: आम्ही बेसमेंटमध्ये लपलो होतो; इस्राइलहून परत येताच नुसरतने दिली प्रतिक्रिया
कुशल आणि सुनैना यांच्यामधील प्रेम बहरत असताना कुशलने तिला लग्नासाठी विचारले. सुनैनाने लगेच होकार कळवला. पण खरी कसरत इथून सुरु झाली. सुरुवातीला सुनैनाच्या घरच्यांकडून या लग्नाला विरोध करण्यात आला होता. पण सुनैना मात्र तिच्या निर्णयावर ठाम होती. आर्थिक अडचणींमुळे कुशलने काही महिने नोकरीही केली होती. मात्र, त्याचे मन रमत नव्हते. शेवटी त्याने नोकरी सोडून अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. तो सतत योग्य संधीच्या शोधात असायचा. अखेर आज कुशल लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो.
कुशल आज लोकप्रिय अभिनेता आहे. टीव्ही शो, सिनेमे यांच्या माध्यमातून तो घराघरांच पोहोचलाय. पण त्याचा इथवरचा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. या प्रवासात त्याला त्याची आई आणि सुनैनाची भक्कम साथ होती.त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यानं स्वत: जितकी मेहनत घेतली तितकीत त्याच्या आईनं आणि पत्नीनं घेतल्याचंही कुशल सांगतो.
संबंधित बातम्या