Actress Chahatt Khanna Interview : टीव्ही अभिनेत्री चाहत खन्नाची दोन लग्नं तुटली आहेत. वैयक्तिक आयुष्यातही तिने खूप चढ उतार पाहिले आहेत. चाहतचे पहिले लग्न २००६ मध्ये नरसिंघानी सोबत झाले होते आणि काही महिन्यांनंतर त्यांचे हे नाते तुटले. तिचे दुसरे लग्न फरहान मिर्जीसोबत झाले आणि त्यानंतर तिने इस्लाम धर्म स्वीकारला. २०१८मध्ये चाहतने फरहानसोबत घटस्फोट घेतला होता. तिने पतीवर लैंगिक आणि मानसिक छळाचा खटला दाखल केला होता. आता एका मुलाखतीदरम्यान चाहतने सांगितले की, तिच्या पतीने तिला इस्लाम स्वीकारण्यासाठी ब्रेनवॉश केले. आता सनातन धर्मात परत आल्याचा खूप आनंद होत असल्याचे तिने म्हटले आहे.
चाहत खन्ना 'झूम'शी बोलताना म्हणाली की, ‘मी अजिबात धार्मिक नाही. पण, मी आध्यात्मिक आहे. मी खूप उदारमतवादी आहे आणि सर्व धर्मांवर विश्वास ठेवते. पण मी धर्मांध नाही. लग्न झाल्यावर मला इस्लाम धर्माबद्दल माहिती मिळाली. मला खूप इस्लामी ज्ञान मिळालं. मी येशू ख्रिस्तावरही विश्वास ठेवते. तर, मी काली आणि कृष्णाची भक्त देखील आहे.’
मात्र, घटस्फोटानंतर माला माझ्या पूर्व आयुष्यात परत यायला मला बराच वेळ लागला. इस्लामवर विश्वास ठेवायला मला ४-५ वर्षे लागली आणि आजही मी या धर्मातील काही श्रद्धांचे समर्थन करते. पण, सुदैवाने मी पुन्हा सनातन धर्माच्या मुळाशी आले. मला अनेक गोष्टींमागचं सत्य कळलं. सनातन धर्मात परतल्याबद्दल 'कृतज्ञ' वाटत असल्याचे का वाटते? असा प्रश्न चाहतला विचारण्यात आला.
यावर चाहत म्हणाली की, ‘माझं ब्रेनवॉश करण्यात आलं होतं. लहानपणीपासून तुम्ही जे करत आहात, ते चुकीचं आहे, असं जेव्हा तुम्हाला नेहमी सांगितलं जातं, तेव्हा तुम्हाला काय करत आहात हे काहीच कळत नाही. तुम्ही मनाने खचू लागतात आणि माझ्याबाबतीतही असेच घडले. सनातन धर्मात परत यायला थोडा वेळ लागला. पण मी आता खूप आनंदी आहे.’
चाहतला विचारण्यात आले की, तिचे ब्रेनवॉश झाले होते का? यावर चाहत म्हणाली की, 'मला माहीत नाही ते काय होते. पण हो, मी हे सांगू शकते की, जे झालं ते खूपच भयंकर होतं. म्हणून, मला आता असं वाटत की, मी आता घरी परत आले आहे. मला माझ्या देवाची पूजा करण्यास मनाई करण्यात आली होती. ती सर्वात वाईट गोष्ट होती. पण, आता मला काय बरोबर आणि काय अयोग्य हे कळले आहे.
संबंधित बातम्या