चित्रपट सुरू होण्याआधी नाही बघावा लागणार ‘सिगारेट फुकणारा नंदू’! अक्षय कुमारची ‘ती’ जाहिरात बंद करण्याचे आदेश
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  चित्रपट सुरू होण्याआधी नाही बघावा लागणार ‘सिगारेट फुकणारा नंदू’! अक्षय कुमारची ‘ती’ जाहिरात बंद करण्याचे आदेश

चित्रपट सुरू होण्याआधी नाही बघावा लागणार ‘सिगारेट फुकणारा नंदू’! अक्षय कुमारची ‘ती’ जाहिरात बंद करण्याचे आदेश

Published Oct 16, 2024 10:59 AM IST

Akshay Kumar Advertisement : केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने (सीबीएफसी) अक्षय कुमारची जाहिरात बंद करण्याचे आदेश दिले आहेत. ही जाहिरात व्हायरल झाल्यानंतर सहा वर्षांनी हा निर्णय घेण्यात आला आहे.

अक्षय कुमाची जाहिरात
अक्षय कुमाची जाहिरात

Akshay Kumar Advertisement Banned : चित्रपटगृहात सिनेमा बघायला गेलो की, चित्रपट सुरू होण्यापूर्वी अक्षय कुमारची जाहिरात नक्कीच पाहायला मिळते. यात अक्षय कुमार 'नंदू'ला धूर न उडवण्याचा, म्हणजेच सिगारेट न ओढण्याचा सल्ला देताना दिसतो. ही जाहिरात इतकी वर्षे चित्रपटगृहात सुरू आहे की, प्रेक्षकांना जाहिरातीतील संवाद पाठ झाले आहेत. मोठ्या पडद्यावर जेव्हा ही जाहिरात चालते, तेव्हा चित्रपटगृहात येणारे लोकही एकाच वेळी जाहिरातीचे संवाद म्हणताना दिसतात.  मात्र, आता सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन म्हणजेच सीबीएफसीने या जाहिरातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सीबीएफसीने असे का केले याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अक्षय कुमारची ही जाहिरात सहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा प्रसारित झाली होती. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, ‘विकी और विद्या का वो वाला व्हिडिओ’ हा चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना नंदू आणि अक्षय कुमारची जाहिरात थिएटरमध्ये पाहायला मिळाली नाही. ही जाहिरात हटवण्याचा निर्णय गेल्या महिन्यात घेण्यात आल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, या जाहिरातीची जागा घेणारी नवी जाहिरात आता तंबाखू सोडण्याचा सकारात्मक संदेश देताना दिसणार आहे. अक्षय कुमारच्या जाहिरातीची जागा आता एका जाहिरातीने घेतली आहे, ज्यात धूम्रपान केल्याच्या २० मिनिटांनंतर आपल्या शरीरात काय बदल होतात हे दाखवण्यात आले आहे.

Akshay Kumar: गर्लफ्रेंडला सिद्धीविनायक मंदिरात घेऊन जायचा अन्…; अक्षय कुमारची डेटिंग ट्रीक माहितीये का?

काय होती ही जाहिरात?

या जाहिरातीत अक्षय कुमार कुठून तरी सायकलने येताना दिसतो.  समोर नंदूला पाहताच तो सायकल थांबवतो आणि विचारतो की, नंदू हॉस्पिटलच्या बाहेर उभा राहून हा धूर का सोडत आहेस? त्यानंतर नंदू आपल्या पत्नीला 'महिलांचा एक आजार' झाल्याचे सांगतो. यावर अक्षय त्याला सांगतो की, तू जितक्या सिगारेट ओढतोस, तितक्याच पैशांमध्ये वहिनीसाठी सॅनिटरी पॅड येऊ शकते, ज्यामुळे मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या आजारांपासून त्यांचे संरक्षण होऊ शकते.

अक्षय कुमारची ही जाहिरात पहिल्यांदा २०१८मध्ये दाखवण्यात आली होती. या जाहिरातीत अजय सिंह पालने नंदूची भूमिका साकारली होती. २०१२ मध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सहकार्याने एक आदेश जारी केला होता. या आदेशानुसार चित्रपटाच्या सुरुवातीला धूम्रपानविरोधी जाहिरात चालवणे आवश्यक होते, ज्यामध्ये धूम्रपान दृश्य दाखवले जाईल. या सूचनेनंतर चित्रपटांपूर्वी धूम्रपानविरोधी जाहिराती सुरू करण्यात आल्या होत्या.

Whats_app_banner