मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘त्याने स्तनांना स्पर्श केला अन् कपडे...’; मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत हिंदी मालिका विश्वात कास्टिंग काऊच!

‘त्याने स्तनांना स्पर्श केला अन् कपडे...’; मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत हिंदी मालिका विश्वात कास्टिंग काऊच!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 31, 2024 10:04 AM IST

एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेल्या कास्टिंग काऊचच्या घटनेचा खुलासा केला आहे. तिची ही आपबिती ऐकून सगळेच हादरले आहेत.

‘त्याने स्तनांना स्पर्श केला अन् कपडे...’; मराठी अभिनेत्रीसोबत हिंदी मालिका विश्वात कास्टिंग काऊच!
‘त्याने स्तनांना स्पर्श केला अन् कपडे...’; मराठी अभिनेत्रीसोबत हिंदी मालिका विश्वात कास्टिंग काऊच!

मनोरंजन विश्वातून कास्टिंग काऊचसारखी प्रकरणे अनेकदा समोर येत असतात. केवळ अभिनेत्रीच नाही, तर पुरुष कलाकारही कास्टिंग काऊचचे बळी ठरले आहेत. अशा परिस्थितीत आता एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेल्या कास्टिंग काऊचच्या घटनेचा खुलासा केला आहे. तिची ही आपबिती ऐकून सगळेच हादरले आहेत.हिंदी मालिका विश्वात सक्रिय असणारी प्रसिद्धी मराठीअभिनेत्री सोनल वेंगुर्लेकर हिच्यासोबत कास्टिंग काऊचचे प्रकरण घडले होते. सोनल टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे. अगदी लहान वयातच तिने करिअरला सुरुवात केली होती.'वादा रहा', 'ये तेरी गलियां', 'साम दाम दंड भेड', 'गुप्ता ब्रदर्स', 'शास्त्री सिस्टर्स' यांसारख्या अनेक टीव्ही शोमध्ये मुख्य भूमिकेत झळकलेल्या सोनलने तिच्यासोबत घडलेली कास्टिंग काऊचची घटना सांगितली आहे.

सोनलने एका मुलाखतीत तिचा कास्टिंग काऊचचा भयानक अनुभव शेअर केला होता. त्याचा आपल्या मनावर खोलवर परिणाम झाल्याचेही त्यांनी सांगितले. सोनल म्हणाली होती की, ‘त्यावेळी मी फक्त१९ वर्षांची होते. जेव्हा इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर आणि फोटोग्राफर राजा बजाज यांनी माझ्यासोबत घाणेरडे कृत्य केले होते. २०१८मध्ये मी राजा बजाजच्या ऑफिसमध्ये एका भूमिकेच्या ऑडिशनसाठी गेले होते. त्यावेळी राजा हे प्रसिद्ध फोटोग्राफर आणि कास्टिंग डायरेक्टर होते. मी ऑडिशन दिली होती, पण पूर्ण प्रशिक्षण न घेतल्याने मला संवाद नीट बोलता येत नव्हते. यानंतर त्यांनी मला शूटिंगमध्ये मदत करण्याचे आश्वासन दिले.’

त्याने आधी माझ्या स्तनांना स्पर्श केला...

यानंतर सोनल म्हणाली, 'मी त्या शूटिंगचा भाग नव्हते, तरी कास्टिंग डायरेक्टरने मला काही आउटफिट्स ट्राय करायला सांगितले. यानंतर त्याने जबरदस्तीने माझ्या स्तनांवर क्रीम लावले. त्याच्या या कृतीने मी खूप घाबरले. ही फक्त पहिलीच घटना होती. यानंतर, त्याने रात्री जबरदस्तीने माझ्या खोलीत प्रवेश केला आणि रातोरात इंडस्ट्रीची सुपरस्टार बनवण्यासाठी तंत्रविद्या शिकवण्याचे बोलू लागला. तो म्हणाला की, मला ही तंत्रविद्या त्याच्यासोबत कपड्यांशिवाय करावी लागेल. मला पूर्ण नग्न अवस्थेत मंत्र जप करावा लागेल. तो जे काही बोलेले ते करावे लागेल. त्याने माझ्यावर जबरदस्ती करण्याच्फ्हा प्रयत्न करत, माझे कपडे काढण्याचा प्रयत्न केला. पण, त्यावेळी मी कसे तरी स्वतःला वाचवले आणि तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले. मी सरळ एका मॉडेलच्या खोलीत गेले, जिथे तिची आई देखील तिच्यासोबत होती.’ या संपूर्ण घटनेनंतर सोनल वेंगुर्लेकर हिने राजा बजाज यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

IPL_Entry_Point