Rangada: अस्सल मातीतील कुस्ती आणि बैलगाडा शर्यतीचा थरार; 'रांगडा' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rangada: अस्सल मातीतील कुस्ती आणि बैलगाडा शर्यतीचा थरार; 'रांगडा' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Rangada: अस्सल मातीतील कुस्ती आणि बैलगाडा शर्यतीचा थरार; 'रांगडा' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 29, 2024 12:11 PM IST

Rangada Trailer: गेल्या काही दिवसांपासून 'रांगडा' या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. या चित्रपटाचा आता धमाकेदार ट्रोलर प्रदर्शित झाला आहे.

Rangada movie Trailer: 'रांगडा' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
Rangada movie Trailer: 'रांगडा' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

महाराष्ट्राच्या मातीतली अस्सल कुस्ती आणि बैलगाडा शर्यत केंद्रस्थानी असलेल्या 'रांगडा' चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु आहे. एक अनोखा चित्रपट पाहायला मिळणार असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

काय आहे ट्रेलर?

'रांगडा' चित्रपटाच्या २ मिनिटे २८ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाला कुस्ती आणि बैलगाडा शर्यतीचा असलेला छंद, त्यासाठी त्याला करावा लागणारा संघर्ष दाखवण्यात आला आहे. शिवाय तगडे, बलदंड नायक, खलनायक, देखणी नायिका असल्याने प्रेमकथा, राजकारण, तुफान अॅक्शनचा धडाकेबाज तडका या चित्रपटात आहे. ग्रामीण पार्श्वभूमीवरचं कथानक आजवर अनेक चित्रपटांमधून रुपेरी पडद्यावर आले असले, तरी त्यात रांगडा हा चित्रपट नक्कीच वेगळा ठरणार आहे. या चित्रपटाच्या सकस कथानकाची मांडणी तांत्रिकदृष्ट्या तितक्याच उत्तम पद्धतीनं करण्यात आल्याचं ट्रेलरवरून दिसून येते.
वाचा: लेकाच्या लग्नासाठी नीता अंबानी यांची खास तयारी, खरेदी केलेल्या नव्या साडीची किंमत माहिती आहे का?

कधी प्रदर्शित होणार चित्रपट?

प्रेमकथा, राजकारण, अॅक्शन असलेल्या या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता असून, १२ जुलैला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च भोसरी विधानसभेचे आमदार पैलवान महेशदादा लांडगे आणि समस्त बैलगाडा मालक, पैलवान मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत अंकुशराव लांडगे सभागृह, भोसरी येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
वाचा: 'प्रेमासाठी लढणार', ब्रेकअपच्या चर्चांवर अखेर मलायका अरोराने सोडले मौन

कोणते कलाकार दिसणार?

'रांगडा' या चित्रपटात भूषण शिवतारे, मयुरी नव्हाते, अमोल लंके, भीमराज धनापुणे,अतिक मुजावर, संदीप (बापु)रासकर,राजेंद्र गुंजाळ, पल्लवी चव्हाण, निकिता पेठकर, निलेश कवाद या कलाकारांच्या दमदार प्रमुख भूमिका आपल्याला चित्रपटात पहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे, दोन राष्ट्रीय कुस्तीपटू चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. अरुण वाळूंज, प्रमोद अंबाडकर यांनी लिहिलेल्या गीतांना रोहित नागभिडे यांचे सुमधुर संगीत लाभले आहे.
वाचा: मुंबईतील पॉश भागात आमिर खानने खरेदी केला नवा फ्लॅट, किंमत वाचून बसेल धक्का

Whats_app_banner