Somy Ali Injured: बॉलिवूडचा ‘दबंग’ अर्थात सलमान खान याची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. सध्या वृत्त समोर येत आहे की, सोमी अलीवर हल्ला झाला आहे. अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्ती सोमी अली हिच्यावर मानवी तस्करीच्या पीडितेला वाचवण्याच्या प्रयत्नात कथित हल्ला करण्यात आला, ज्यात ती जखमी झाली आहे. याचा खुलासा खुद्द अभिनेत्रीने केला आहे. सध्या ती अतिशय वेदनेत आहे.
सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने सांगितले की, ‘मानवी तस्करी पीडितांना वाचवण्यासाठी मी पोलिसांसोबत काम करते. जोपर्यंत ते पीडितेला घराबाहेर काढत नाहीत तोपर्यंत मला माझ्या कारमधून बाहेर पडू दिले जात नाही. गेल्या १७ वर्षात माझ्यावर झालेला हा नववा हल्ला आहे. आम्ही एकाचवेळी पीडित आणि तस्कर यांची वाट पाहत होतो. पीडितेला अजिबात कल्पना नव्हती की, तिला अशा घरात साफसफाई करण्यासाठी कामावर ठेवण्यात आले आहे, जिथे तस्करांनी आधीच्या पीडितांना लपवले आहे.’
या घटनेबद्दल बोलताना सोमीने मानवी तस्करीची शिकार झालेल्या महिलेला वाचवताना तिच्यावर कसा हल्ला झाला, हे देखील सांगितले. अभिनेत्री म्हणाली की, ‘दुर्दैवाने पीडिता घराकडे जात असताना मी माझ्या कारमधून बाहेर पडले, तिने आत जाऊ नये, असे मला वाटले. कारण तस्कर आधीच घरात घुसले होते. पोलिसांनी मला ते येत असल्याचे सांगितले होते आणि घर रिकामे होते. मी माझ्या कारमधून बाहेर आले, तेव्हा तस्करांनी एकाच वेळी घरावर आणि आमच्यावर हल्ला केला. त्यांच्यापैकी एकाने माझा डावा हात पकडला आणि तो वाईटरित्या पिरगळला. मी देवाची आभारी आहे की, हाताला केवळ हेअरलाईन फ्रॅक्चर झाले. पण मला खूप वेदना होत आहेत आणि मी अंथरुणावर पडून आहे.’
आपल्या तब्येतीची माहिती देताना तिने पुढे सांगितले की, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला बरे होण्यासाठी ६ ते ८ आठवडे लागतील. तिचे डावे मनगट आणि हात खूप सुजले होते, त्यामुळे ती हात हलवू शकत नव्हती. आता काही काळ विश्रांती घेणार असल्याचेही तिने सांगितले. सोमी सली नेहमीच तिच्या बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत असते. तिने नेहमीच सलमान खान विषयी वेगवेगळी वक्तव्ये केली आहेत. कधी ती सलमान खानवर टीका करते, तर कधी त्याची बाजू उचलून धरत असते.
संबंधित बातम्या