मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Brahmastra: बहिष्काराची मोहीम चालवूनही 'ब्रह्मास्त्र'ला फरक पडला नाही; दहाव्या दिवसाची कमाई बघाच!
ब्रह्मास्त्र
ब्रह्मास्त्र (HT)

Brahmastra: बहिष्काराची मोहीम चालवूनही 'ब्रह्मास्त्र'ला फरक पडला नाही; दहाव्या दिवसाची कमाई बघाच!

19 September 2022, 14:19 ISTAarti Vilas Borade

Brahmastra Box Office Collection: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मख्य भूमिकेत असणारा 'ब्रह्मास्त्र पार्ट वन: शिवा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा बहुचर्चित 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट ९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जीने केले आहे. चित्रपटची कथा आणि तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांना आवडत आहे. त्यामुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या १०व्या दिवशी देखील बक्कळ कमाई केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

'ब्रह्मास्त्र' प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. आता चित्रपटाने १० दिवसांमध्ये २०० कोटी रुपयांच्या कमाईचा आकडा पार केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, रविवारी चित्रपटाने भारतात १६ कोटी ३० लाख रुपयांची कमाई केली आहे. १० दिवसात चित्रपटाने २१५.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळते. तिसऱ्या आठवड्यात चित्रपट २५० कोटी रुपयांचा पल्ला पार करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वाचा: 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला डेट करतोय सुपरस्टार प्रभास?

पहिल्याच दिवशी चित्रपटाने ३६.४२ कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने ३२ कोटी रुपये कमावले होते. पहिला संपूर्ण आठवडा चित्रपटाने १७३.२२ कोटी रुपये कमावले. नंतर दुसऱ्या आठवड्यात शुक्रवारी चित्रपटाने १०.६ कोटी कमावले, शनिवारी १५.३८ कोटींचा गल्ला जमावला. वर्ल्डवाइड चित्रपटाने ३२४.८० कोटी रुपये कमावले आहेत.

९ सप्टेंबर २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या ब्रह्मास्त्र चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जीने केले आहे. या चित्रपटासाठी अयानने जवळपास ८ वर्षे घालवली. या चित्रपटात रणबीर कपूर (Ranbir Kapoor), आलिया भट्ट (Alia Bhatt), नागार्जुन (nagarjuna), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि मौनी रॉय (Mouni Roy) हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. ब्रह्मास्त्र चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाचा दुसरा भाग 'ब्रह्मास्त्र २: देव' याची आतुरतेने वाट पाहात आहेत.

विभाग