Viral Video: रिल बनवण्यासाठी आणि सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही. काहीजण आपला जीव देखील धोक्यात घालतात तर काहीजण इतरांसाठी खतरनाक ठरतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसणारी एक व्यक्ती स्वत:ला लखनऊचा सलमान खान म्हणत आहे. तसेच तो मुंबईमध्ये शर्ट काढून फिरताना दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती ही आजम अंसारी आहे. तो स्वत:ला लखनऊचा सलमान खान म्हणवून घेतो. तो मुंबईत सलमान खानला भेटण्यासाठी येणार आला होता. त्याने सलमानला भेटण्यासाठी केलेली विनंती ऐकली गेली नाही. पण असा दावा केला जात आहे की तो मुंबईत कपडे काढून रील तयार करत होता, तेव्हा मुंबई पोलिसांनी त्याला पकडले. आजमचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आजम अंसारी गेटवे ऑफ इंडिया समोर उभा राहून रील तयार करत आहे. तो शर्टलेस असून अभिनेता सलमान खानच्या स्टाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि लोकांचे म्हणणे आहे की हा कोणत्या अँगलने सलमान खानसारखा दिसतो? सोशल मीडियावर आजमची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
एका यूजरने व्हायरल झालेल्या व्हिडीओवर 'हा कोणत्या अँगलने सलमान खान सारखा दिसतो याचा शोध सुरु आहे. तुम्हाला याबाबत माहिती लवकरच देण्यात येईल' अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक वेडे झाले आहेत. काहीही करताना दिसत आहेत' असे म्हणत सुनावले आहे. तिसऱ्या एका व्यक्तीने, 'जर सलमान खानने हा व्हिडीओ पाहिला तर त्याला हसू अनावर होईल' असे म्हटले आहे.
वाचा: 'लाफ्टर शेफ'च्या सेटवर रीम शेखनंतर राहुल वैद्यचा अपघात, चेहऱ्यावर आली आग
सलमान खान हा बॉलिवूडचा दबंग खान म्हणून ओळखला जातो. गेल्या काही दिवसांपासून त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होताना दिसत आहेत. पण येत्या काळात त्याचे चित्रपट जादू करतील अशी अपेक्षा प्रेक्षकांना आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, आधी शाहरुख खानचा चित्रपट 'पठाण 2' तयार होईल आणि त्यानंतर 'टायगर वर्सेस पठाण'चे शूटिंग सुरू होईल.