रश्मिका मंदानाची होणार कोंडी; विकी कौशल की अल्लू अर्जुन कुणाला देणार साथ? एकाच दिवशी प्रदर्शित होणार दोन चित्रपट
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  रश्मिका मंदानाची होणार कोंडी; विकी कौशल की अल्लू अर्जुन कुणाला देणार साथ? एकाच दिवशी प्रदर्शित होणार दोन चित्रपट

रश्मिका मंदानाची होणार कोंडी; विकी कौशल की अल्लू अर्जुन कुणाला देणार साथ? एकाच दिवशी प्रदर्शित होणार दोन चित्रपट

Jun 18, 2024 10:12 AM IST

विकी कौशल, अल्लू अर्जुनला टक्कर देणार की चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलणार? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. तर, रश्मिका मंदाना या दोन्ही चित्रपटांची मुख्य नायिका आहे.

अल्लू अर्जुन आणि विकी कौशल यांच्यात चुरस रंगणार
अल्लू अर्जुन आणि विकी कौशल यांच्यात चुरस रंगणार

 साऊथ स्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २: द रूल' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. अभिनेत्याने एक पोस्ट शेअर केली आणि माहिती दिली की ‘पुष्पा २’ आता ६ डिसेंबररोजी चित्रपटगृहात धडकेल. १५ ऑगस्टच्या सुट्टीच्या निमित्ताने अनेक मोठे सिनेमे एकमेकांना भिडत होते. त्यामुळे मेकर्सने चित्रपटाची रिलीज डेट बदलण्याचा निर्णय घेतला. मात्र, ६ डिसेंबरला अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ आणि विकी कौशलचा ‘छावा’ एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर भिडणार आहेत. विशेष म्हणजे दोन्ही चित्रपटात रश्मिका मंदाना मुखू भूमिकेत आहे.

विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांचा 'छावा' हा चित्रपट ६ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा एक ऐतिहासिक-ड्रामा चित्रपट आहे. चित्रपटात नव्या जोडीला पाहण्याची प्रेक्षक वाट पाहत आहे. पण, आता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’च्या नव्या रिलीज डेटची घोषणा झाल्यानंतर विकी आणि रश्मिकाला ‘छावा’मध्ये पाहण्याची प्रतीक्षा वाढू शकते, असा अन्साज वर्तवला जात आहे. निर्माते ‘पुष्पा २’सोबत ‘छावा’ प्रदर्शित करण्याचा निर्णय घेऊ शकत नाहीत. तसेच दोन्ही चित्रपटांमध्ये रश्मिका महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

‘पुष्पा २’मध्ये नवे ट्वीस्ट!

‘पुष्पा २’ हा चित्रपट जवळपास तीन वर्षांपासून प्रतीक्षेत आहे. अशा तऱ्हेने बॉक्स ऑफिसवर टक्कर झाल्यास दोनही चित्रपटांचे नुकसान होण्याची दाट शक्यता असते. यावेळी निर्मात्यांनी ‘पुष्पा २’च्या कथेत दमदार ट्विस्टची भर घातली आहे. तसेच, नवीन कथा भंवर सिंहच्या सूडाची असेल, जी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक विकी कौशलच्या ‘छावा’कडे दुर्लक्ष करू शकतात. ‘पुष्पा २’चे दिग्दर्शन सुकुमारन यांनी केले आहे.

Vicky Kaushal
Vicky Kaushal

विकी कौशलच्या लूकने वाढवली उत्सुकता!

दुसरीकडे ‘छावा’मधील विकी कौशलचा लूक समोर आला आहे. एका ऐतिहासिक कथेवर आधारित हा चित्रपट आहे. नुकताच सेत्वरून विकी कौशलचा एक फोटो लीक झाला होता, ज्यात तो एका वेगळ्या गेटअपमध्ये दिसला होता. खूप संशोधन करून बनवलेला हा एक ऐतिहासिक ड्रामा चित्रपट आहे. रश्मिका या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. येत्या काही दिवसांत ‘छावा’चे निर्माते प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर करू शकतात.

Whats_app_banner