Box Office Collection: पुन्हा प्रदर्शित झालेल्या 'करण अर्जुन'ने बॉक्स ऑफिसवर मारली बाजी, 'पुष्पा'ला टाकले मागे
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Box Office Collection: पुन्हा प्रदर्शित झालेल्या 'करण अर्जुन'ने बॉक्स ऑफिसवर मारली बाजी, 'पुष्पा'ला टाकले मागे

Box Office Collection: पुन्हा प्रदर्शित झालेल्या 'करण अर्जुन'ने बॉक्स ऑफिसवर मारली बाजी, 'पुष्पा'ला टाकले मागे

Aarti Vilas Borade HT Marathi
Nov 25, 2024 02:38 PM IST

Box Office Collection: शाहरुख खान आणि सलमान खानचा करण अर्जुन हा चित्रपट अल्लू अर्जुनच्या पुष्पा - द राइज या चित्रपटाला टक्कर देत आहे. आता कोणत्या चित्रपटाने किती कमावले चला जाणून घेऊया...

Karan Arjun and Pushpa
Karan Arjun and Pushpa

अलीकडच्या काळात जुन्या चित्रपटांच्या पुन्हा प्रदर्शनाची क्रेझ झपाट्याने वाढली आहे. 'गदर', 'लैला मजनू', 'तुंबाड' यांसारखे सिनेमे पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाले, तेव्हा लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. थिएटर तुटूंब भरलेले पाहायला मिळाले. त्यानंतर बहुतांश निर्माते आपल्या चित्रपटाचा दुसरा भाग जाहीर करण्यापूर्वी किंवा प्रदर्शित करण्यापूर्वी चित्रपटाचा पहिला भाग चित्रपटगृहात पुन्हा प्रदर्शित करताना दिसत आहेत. शाहरुख खान आणि सलमान खानचा 'करण अर्जुन' आणि 'पुष्पा - द राइज' हा चित्रपट नुकताच पुन्हा प्रदर्शित झाला. आता कोणत्या चित्रपटाने किती कमाई केली चला जाणून घेऊया...

निर्मात्यांच्या नियोजित चित्रपटांच्या कमाईचे आकडे जाहीर करणाऱ्या 'सचनिल्क' या प्लॅटफॉर्मने एका अहवालात म्हटले आहे की, २४ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेले पुष्पा - द राइज आणि करण अर्जुन या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. चित्रपटगृहात दोन्ही चित्रपट पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. शाहरुख खान आणि सलमान खानचा करण अर्जुन हा चित्रपट देशभरात २००० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे.

करण अर्जुनचे किती केली कमाई?

निर्मात्यांनी ओपनिंग वीकेंडसाठी एवढ्या मोठ्या संख्येने स्क्रीन बुक केल्या असल्या तरी त्या गोष्टीचे व्यवसायात रूपांतर होताना दिसत नाही. चित्रपटाचे ओपनिंग ग्रॉस कलेक्शन १ कोटी रुपयेही होऊ शकले नाही. प्रदर्शनाच्या दिवशी या चित्रपटाने ३० लाख रुपयांची कमाई केली आणि दुसऱ्या दिवशी ही कमाई जवळपास अर्ध्या पेक्षाही कमी झाली. रविवारी या चित्रपटाने जवळपास ४० लाख रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये जवळपास १.६० कोटींची कमाई केली आहे. पण त्याची तुलना 'पुष्पा - द राइज'शी केली तर ती किती आहे चला जाणून घेऊया.
वाचा: कोणी पत्नीचे दागिने गहाण ठेवले तर कोणी राहते घर; कर्जात बुडाले होते 'हे' मराठी कलाकार, पण...

पुष्पा सिनेमाने किती केली कमाई?

अल्लू अर्जुनच्या पुष्पा - द राइज या चित्रपटाचे ओपनिंग वीकेंड कलेक्शन फक्त ७० लाख रुपये केले आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने केवळ २० लाख रुपये कमावले. दुसऱ्या दिवशी हा आकडा २५ लाखांवर गेला. तिसऱ्या दिवशीही कमाई तशीच राहिली. म्हणजेच शाहरुख खान आणि सलमान खानचा 'करण अर्जुन' पुष्पा - द राइज या चित्रपटापेक्षा सरस ठरताना दिसत आहे. ट्रेड एक्सपर्टच्या मते, 'पुष्पा - द राइज' फारशी कमाई करू शकला नाही याचे एक कारण म्हणजे या चित्रपटाविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात अपयश आले आहे. निर्मात्यांचे संपूर्ण लक्ष सध्या पुष्पा - द रूल वर आहे, जो 5 डिसेंबररोजी प्रदर्शित होणार आहे.

Whats_app_banner