मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  गौरव मोरेच्या 'अल्याड पल्याड'ने दिली बॉलिवूड सिनेमाला टक्कर, जाणून घ्या कमाईविषयी

गौरव मोरेच्या 'अल्याड पल्याड'ने दिली बॉलिवूड सिनेमाला टक्कर, जाणून घ्या कमाईविषयी

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 18, 2024 01:01 PM IST

सध्या 'अल्याड पल्याड' या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाने ३ दिवसांमध्ये किती कमाई केली असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया..

Alyad Palyad गौरव मोरेच्या अल्याड पल्याडी बॉक्स ऑफीसवर हवा
Alyad Palyad गौरव मोरेच्या अल्याड पल्याडी बॉक्स ऑफीसवर हवा

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सध्या वेगवेगळे चित्रपट येत आहेत. हे चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहेत. यामध्ये 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील गौरव मोरेचा चित्रपटदेखील सहभागी आहे. 'अल्याड पल्याड' हा एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे. हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

'अल्याड पल्याड' हा एक भयपट आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच सर्वांमध्ये चर्चा रंगली होती. १४ जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने तीन दिवसात किती कमाई केली हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. आता चित्रपटातील अभिनेता गौरव मोरेने स्वत: सोशल मीडियावर चित्रपटाची कमाई सांगितली आहे. चला जाणून घेऊया चित्रपटाच्या कमाई विषयी..
वाचा: गौरव मोरेचा ‘अल्याड पल्याड’ चित्रपट कसा आहे? जाणून घ्या प्रेक्षकांकडून

'अल्याड पल्याड' चित्रपटाच्या कमाईविषयी

'अल्याड पल्याड' चित्रपटाने बॉलिवूड चित्रपटाला चांगलीच टक्कर दिली आहे. २०० हून अधिक चित्रपटगृहांमध्ये 'अल्याड पल्याड' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने तीन दिवसात १.०७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तसेच येत्या काळात हा चित्रपट आणखी कमाई करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता आणखी वाढली आहे.
वाचा: 'भारतात २०१४मध्ये पाकिस्तानी अभिनेत्याची प्रचंड क्रेझ होती', रत्ना पाठक यांनी सांगितला किस्सा

काय आहे चित्रपटाची कथा

आपला महाराष्ट्र हा समृद्धतेने आणि विविधतेने नटलेला आहे. त्यात अनेक जुन्या संस्कृती तसेच प्रथा परंपरा आहेत. अशाच एका वेगळ्या परंपरेची आराधना करण्याची प्रथा असणाऱ्या एका गावाची, तिथल्या माणसांची कथा सांगणारा ‘अल्याड पल्याड’ हा थरारपट आहे. आयुष्यात घडणाऱ्या काही चमत्कारिक गोष्टी आणि त्यांचा मागोवा घेताना निर्माण होणारे रहस्य याचा थरारक अनुभव देणारी ही कथा बॉक्स ऑफिसवर चांगला धुमाकूळ घालत आहे.
वाचा: बाप आणि लेकीचं हळवं नातं टिपणाऱ्या 'द्विधा' चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा टीझर प्रदर्शित

कोणते कलाकार दिसत आहेत

मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीरकर, भाग्यम जैन, अनुष्का पिंपुटकर आदि कलाकारांच्या भूमिका ‘अल्याड पल्याड' चित्रपटात आहेत. रहस्य, थरार आणि सोबत मनोरंजन असं पॅकेज मराठीत अभावानेच पाहायला मिळतं. ‘अल्याड पल्याड’ च्या निमित्ताने एक वेगळा चित्रपट पाहायला मिळाल्याचे समाधान प्रेक्षक व्यक्त करताहेत. तसेच अनेकांनी 
वाचा: चाहत्यांना भेटण्यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी शिवलिंगावर केला जलाभिषेक! दाखवली घरातील मंदिराची झलक

WhatsApp channel
विभाग