हेलिकॉप्टर रिक्षासारखं वापरायचे बोनी कपूर! फराह खानने खुशी कपूरसमोरच सगळं सांगून टाकलं
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  हेलिकॉप्टर रिक्षासारखं वापरायचे बोनी कपूर! फराह खानने खुशी कपूरसमोरच सगळं सांगून टाकलं

हेलिकॉप्टर रिक्षासारखं वापरायचे बोनी कपूर! फराह खानने खुशी कपूरसमोरच सगळं सांगून टाकलं

Jan 29, 2025 11:26 AM IST

Boney Kapoor Kissa : बॉलिवूड दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खानने नुकत्याच आपल्या व्लॉगमध्ये अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या चित्रपटाशी संबंधित एक किस्सा सांगितला. बोनी हेलिकॉप्टरचा रिक्षा म्हणून कसा वापर करत होते, हे सांगितले.

हेलिकॉप्टर रिक्षासारखं वापरायचे बोनी कपूर! फराह खानने खुशी कपूरसमोरच सगळं सांगून टाकलं
हेलिकॉप्टर रिक्षासारखं वापरायचे बोनी कपूर! फराह खानने खुशी कपूरसमोरच सगळं सांगून टाकलं

Farah Khan, Boney Kapoor : बॉलिवूड दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान आपल्या व्लॉगमधून खूप अॅक्टिव्ह असते. नुकताच तिने बोनी कपूर आणि त्यांची मुलगी खुशी कपूर यांच्यासोबत एक व्लॉग शूट केला. यावेळी फराह खानने बोनी कपूर यांची मुलगी खुशीला अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या चित्रपटाचा किस्सा सांगितला आहे. त्या चित्रपटातील एका गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान बोनी कपूर हेलिकॉप्टरचा वापर रिक्षा आणि डंझो डिलिव्हरी अॅप म्हणून कसे करत होते, याचा किस्सा तिने संगितला.

बोनी हेलिकॉप्टरचा वापर रिक्षा म्हणून वापर करत होते!

फराह खान ज्या चित्रपटाचा उल्लेख करत होती, त्याचे नाव ‘पुकार’ होते. या चित्रपटातील ‘किस्मत से तुम’ या गाण्याच्या शूटिंगसाठी कलाकार आणि क्रू अलास्कामध्ये पोहोचले होते. या दरम्यान बोनी कपूर त्यांच्या हेलिकॉप्टरचा अक्षरश: रिक्षा म्हणून वापर करत होते. फराहने खुशीला सांगितले की, त्या शूट लोकेशनवर फक्त हेलिकॉप्टरनेच पोहोचता येत होते. फराह म्हणाली की, बोनी यांनी त्यावेळी संपूर्ण टीमसाठी जवळपास १० हेलिकॉप्टरची व्यवस्था केली होती. फराह खुशीला म्हणाली की, ‘त्यावेळी तर तुझे वडील हेलिकॉप्टरचा रिक्षा म्हणून वापर करत होते.’

Boney Kapoor : बोनी कपूर यांना होती 'ती' वाईट सवय; नवऱ्याच्या सवयीला कंटाळून श्रीदेवीने उचललेले कठोर पाऊल

अलास्कामध्ये बनवले बटर चिकन!

फराह पुढे म्हणाली की, दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी त्यावेळी भारतीय पदार्थ खाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी बोनी यांना कुठून तरी एक भारतीय स्वयंपाकी सापडला.  त्यावेळी आम्ही सगळे अलास्काच्या एका कोपऱ्यात होतो जे उत्तर ध्रुवासारखे गारठलेले आहे आणि अशा ठिकाणी  बोनी कपूर यांनी बटर चिकन, नान, बिर्याणी, पनीर आणि दाल मखनीची व्यवस्था केली होती. त्यांनी हा बेत चांगलाच जमवून आणला होता. त्यांना अशा दुर्गम ठिकाणी देखील काही भारतीय स्वयंपाकी मिळाले, त्यांना तिथे सर्व काही आणून दिले गेले. त्याही वेळी या हेलिकॉप्टरचा वापर यांनी डन्झो डिलिव्हरी सारखा केला होता. 

अभिनेते अनिल कपूर आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांची मुख्य भूमिका असलेला ‘पुकार’ हा चित्रपट २००० साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ६.७ आहे. हा चित्रपट तुम्ही घरबसल्या ‘झी ५’वर पाहू शकता. हा चित्रपट अॅक्शन, रोमान्स, ड्रामा चित्रपट आहे.

Whats_app_banner