Janhvi Kapoor Boyfriend: बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून जान्हवी कपूर ओळखली जाते. तिने आजवर काही मोजक्यात चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. चित्रपटांसोबतच जान्हवीच्या खासगी आयुष्याची देखील कायम चर्चा रंगलेली असते. जान्हवी रिलेशनशीपमध्ये आहे. पण जान्हवीच्या नात्याला वडील बोनी कपूर यांचा विरोध असल्याचे म्हटले जाते.
जान्हवी कपूर महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला डेट करत आहे. जान्हवी आणि शिखर पहाडिया यांचे फोटो कायमच व्हायरल होत असतात. कधी डिनर डेटला जाताना तर कधी एकत्र फिरताना त्यांचे फोटो व्हायरल होतात. ते दोघे कधी लग्नबंधनात अडकणार असा प्रश्न देखील त्यांना पडतो. पण बोनी कपूर यांचा नकार असल्याचे दिसत आहे.
वाचा: ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री लग्नासाठी दुबईत गेली अन् तरुंगात पोहोचली; काय झालं नेमकं जाणून घ्या
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विमानतळावर बोनी कपूर हे पापाराझी यांना फोटोसाठी पोझ देताना दिसले. या व्हिडीओमध्ये बोनी कपूर असे काही करताना दिसत आहे की सर्वजण हैरान झाले आहेत. त्यावेळी मागून तिथे शिखर पहाडिया हा पोहचला. पापाराझी हे बोनी कपूर आणि शिखर पहाडिया यांना फोटोसाठी एकसोबत पोझ देण्यास सांगतात. यावेळी थेट शिखर पहाडिया याच्यासोबत फोटोसाठी पोझ देण्यास बोनी कपूर नकार देतात. थेट त्याचे फोटो घेऊ नका हेच बोनी कपूर सांगतात.
वाचा: "तू आई होऊ शकणार नाहीस", जुई गडकरीने सांगितले धक्कादायक वास्तव
व्हिडीओमध्ये बोनी कपूर हे फोटोसाठी पोझ देताना दिसत असून शिखर पहाडिया तिथून निघून जातो. आता या प्रकारानंतर विविध चर्चांना उधाण आले आहे. एका यूजरने तर थेट म्हटले की, 'शिखर पहाडिया बोनी कपूरला जावई म्हणून आवडत नाही असे वाटत आहे.' दुसऱ्या एका यूजरने बोनी कपूर असे का वागत आहेत? असा प्रश्न विचारला आहे. तिसऱ्या यूजरने जान्हवीच्या नात्याला बोनी कपूर यांची परवानगी नाही असे वाटत आहे अशी कमेंट केली आहे.
जान्हवीने धडक या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर हवी तेवढी कमाई केली नाही. त्यानंतर तिचे बवाल, मिली, रुही, बडे मिया छोटे मिया हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. तिचा देवरा हा चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची सर्वजण वाट पाहात आहेत.
संबंधित बातम्या