जान्हवी आणि शिखरचं ठरलं? ‘पापा’ बोनी कपूरनं केलं होणाऱ्या जावयाचं तोंड भरून कौतुक! म्हणाले...
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  जान्हवी आणि शिखरचं ठरलं? ‘पापा’ बोनी कपूरनं केलं होणाऱ्या जावयाचं तोंड भरून कौतुक! म्हणाले...

जान्हवी आणि शिखरचं ठरलं? ‘पापा’ बोनी कपूरनं केलं होणाऱ्या जावयाचं तोंड भरून कौतुक! म्हणाले...

Apr 01, 2024 07:46 AM IST

नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात जान्हवी कपूरचा कथित बॉयफ्रेंड तिच्यासोबत दिसला नाही, तेव्हा लगेच त्यांच्या नात्याबद्दल अफवा उडू लागल्या.

जान्हवी आणि शिखरचं ठरलं? ‘पापा’ बोनी कपूरनं केलं होणाऱ्या जावयाचं तोंड भरून कौतुक! म्हणाले...
जान्हवी आणि शिखरचं ठरलं? ‘पापा’ बोनी कपूरनं केलं होणाऱ्या जावयाचं तोंड भरून कौतुक! म्हणाले...

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असते. सध्या जान्हवी सतत कथित बॉयफ्रेंड शिखर पहारियासोबत स्पॉट होत असते. मंदिर असो वा पार्टी जान्हवी आणि शिखर नेहमीच एकत्र दिसतात. मात्र, नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात जान्हवी कपूरचा कथित बॉयफ्रेंड तिच्यासोबत दिसला नाही, तेव्हा लगेच त्यांच्या नात्याबद्दल अफवा उडू लागल्या. आता एका मुलाखतीत जान्हवी कपूरचे वडील बोनी कपूर यांनी या कार्यक्रमात शिखरच्या अनुपस्थितीचे कारण सांगितले आहे. त्याचबरोबर त्यांनी शिखर पहारियाचे तोंडभरून कौतुक देखील केले आहे.

या पार्टीत जान्हवी कपूर तिचा बॉयफ्रेंड शिखरसोबत का नव्हती, यावर आता बोनी कपूर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी बोलताना चित्रपट निर्माते बोनी कपूर म्हणाले की, ‘शिखरला त्याचे फोटो काढून घ्यायला अजिबात आवडत नाही. त्यामागील त्याचे कारण काय आहे ते मला माहीत नाही. कदाचित आपण जास्त प्रसिद्धी झोतात येऊ नये असे त्याला वाटत असेल. जेव्हा आम्ही दोघे एकत्र दिसतो, तेव्हा त्याच्यावर अधिक प्रश्नांचा भडीमार केला जातो. आणि त्यामुळे हेडलाईन्समध्ये लगेचच शिखर आणि बोनीबद्दल गोष्टी येऊ लागतात. मात्र, यावेळी गोष्टी फक्त बोनीबद्द्ल आहेत.

कपिल शर्माच्या शोमध्ये साडे सहा वर्षानंतर परतली ‘गुत्थी’; पहिल्याच एपिसोडमध्ये उडवली धमाल

तो कधीही माझ्या मुलीचा एक्स होणार नाही: बोनी कपूर

बोनी कपूरने शिखर पहारियाचे कौतुक करताना म्हटले की, ‘मला शिखर खूप आवडतो. खरं तर काही वर्षांपूर्वी जान्हवीचा त्याच्याशी काहीही संबंध नसतानाही मी त्याच्याशी खूप मैत्रीपूर्ण होतो.’ यावेळी जेव्हा बोनी कपूरला शिखरच्या आणि जान्हवी कपूरच्या नात्याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा बोनी कपूर म्हणाले की, ‘मला खात्री होती की, तो (शिखर पहारिया) माझ्या मुलीचा एक्स कधीच होऊ शकत नाही. तो तिच्यासोबत काय राहणार आहे.’

‘त्याने स्तनांना स्पर्श केला अन् कपडे...’; मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत हिंदी मालिका विश्वात कास्टिंग काऊच!

बोनी कपूर यांनी केले शिखरचे कौतुक!

शिखर पहारियाचे कपूर कुटुंबाशी फार चांगले संबंध आहेत, हे इंडस्ट्रीतच नव्हे तर चाहत्यांना देखील चांगलेच माहिती आहे. कपूर कुटुंबाच्या अनेक कठीण प्रसंगातही तो नेहमी त्यांच्यासोबत उभा राहिला आहे. याबद्दल बोलताना बोनी कपूर म्हणाले की, ‘तो असाच आहे. प्रत्येक प्रसंगात तुमच्या पाठीशी उभा राहणारा माणूस. जान्हवी असो की, मी किंवा अर्जुन कपूर. तो सगळ्यांशी खूप मैत्रीपूर्ण असतो. तो आमच्या कुटुंबातील एक भाग आहे.’

Whats_app_banner