Tiger 3 OTT Released: सलमान खानचा 'टायगर ३' येणार ओटीटीवर, जाणून घ्या कधी आणि कुठे
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tiger 3 OTT Released: सलमान खानचा 'टायगर ३' येणार ओटीटीवर, जाणून घ्या कधी आणि कुठे

Tiger 3 OTT Released: सलमान खानचा 'टायगर ३' येणार ओटीटीवर, जाणून घ्या कधी आणि कुठे

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Nov 14, 2023 03:33 PM IST

Salman Khan Tiger 3 OTT: बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा 'टायगर ३' हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे.

Tiger 3
Tiger 3

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा प्रत्येक चित्रपट हा प्रेक्षकांसाठी खास असतो. गेल्या काही दिवसांपासून 'टायगर ३' या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात होते. आता दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. १२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता ओटीटी फ्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.

सलमानच्या प्रत्येक चित्रपटाची चाहत्यांमध्ये क्रेझ पाहायला मिळते. 'टायगर ३' या चित्रपटाने दोन दिवसात बॉक्स ऑफिसवर १०० कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. अनेक चित्रपटगृहांमध्ये टायगर ३ चित्रपटाचे शो हाऊसफूल होताना दिसत आहेत. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचे कळताच चाहत्यांना सुखद धक्काच बसला आहे. टायगर ३ हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वाचा: सलमान खानच्या चाहत्यांची हुल्लडबाजी, 'टायगर ३' सुरु असताना सिनेमा गृहात फटाक्यांची आतिषबाजी

टायगर ३ चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची एण्ट्री सर्वांचे लक्ष वेधताना दिसत आहे. त्यामुळे चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने आता 'जवान' आणि गदर २ या चित्रपटांचे कमाईच्या बाबतीत रेकॉर्ड मोडल्याचे समोर आले आहे.

'टायगर ३' या चित्रपटात सलमान खानसोबत अभिनेत्री कतरिना कैफ, इमरान हाश्मी हे कलाकार देखील दिसत आहेत. हा चित्रपट १२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई करताना दिसत आहे.

Whats_app_banner