Bollywood Flop Movie: सुपरफ्लॉप! ३ सुपरस्टार, १५० कोटी बजेट तरीही 'हा' सिनेमा ठरला फ्लॉप
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bollywood Flop Movie: सुपरफ्लॉप! ३ सुपरस्टार, १५० कोटी बजेट तरीही 'हा' सिनेमा ठरला फ्लॉप

Bollywood Flop Movie: सुपरफ्लॉप! ३ सुपरस्टार, १५० कोटी बजेट तरीही 'हा' सिनेमा ठरला फ्लॉप

Aarti Vilas Borade HT Marathi
Nov 26, 2024 11:23 AM IST

Bollywood Flop Movie: बॉलिवूडच्या फ्लॉप चित्रपटांच्या यादीतही या सिनेमाचं नाव आहे. या चित्रपटात तीन सुपरस्टार होते आणि बजेट १५० कोटी रुपये होते. तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करु शकला नाही.

Bollywood Flop Movie
Bollywood Flop Movie

गेल्या वर्षी एक चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात एक-दोन नव्हे तर तीन सुपरस्टार होते. मोस्ट अवेटेड चित्रपट म्हणून या चित्रपटाचे वर्णन केले जात होते. पण जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा समीक्षकांनी त्याला नकारात्मक प्रतिसाद दिला. समीक्षकच नव्हे तर लोकांनीही या चित्रपटावर बरीच टीका केली. त्यामुळे प्रेक्षकांनी देखील चित्रपटाकडे पाठ फिरवली. हा चित्रपट २०२३ सालचा सर्वात मोठा फ्लॉप सिनेमा ठरला होता. आता हा चित्रपट कोणता आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

या चित्रपटात अमिताभ बच्चन, टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉन हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसले होते. गेल्या वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सनिल्कच्या रिपोर्टनुसार, दसऱ्याच्या वेळी चित्रपटगृहात दाखल होऊनही पहिल्या दिवशी या चित्रपटाने केवळ अडीच कोटी रुपयांची कमाई केली होती.

चित्रपटाने किती केली कमाई?

चित्रपटाच्या एकूण कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 13.02 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर या चित्रपटाने जगभरात १८ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. यामुळेच या चित्रपटाला सुपरफ्लॉप हे नाव मिळाले. बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार असूनही चित्रपट फ्लॉप ठरला होता.
वाचा: कोल्हापूरच्या मराठमोळ्या मुलीच्या प्रेमात पडला आर माधवन, जाणून घ्या पत्नीविषयी

काय आहे सिनेमाचे नाव?

आत्तापर्यंत आपण कोणत्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत हे तुम्हाला समजले असेलच. हो! 'गणपत - अ हिरो इज बॉर्न' असं या सिनेमाचं नाव आहे. १५० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाला आयएमडीबीवर केवळ २.७ रेटिंग मिळाले आहे. तसेच हा चित्रपट २०२३ या सालातील सुपरफ्लॉप सिनेमा म्हणून ही ओळखला जातो. हा चित्रपट ओटीटीवर देखील प्रदर्शित झाला. पण तेथीही प्रेक्षकांचा फार प्रतिसाद सिनेमाला मिळाला नाही.

Whats_app_banner