मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Drishyam Remake : अजय देवगणचा सुपरहिट चित्रपट ‘दृश्यम’ हॉलिवूड गाजवणार; इंग्रजी रिमेक येतोय!

Drishyam Remake : अजय देवगणचा सुपरहिट चित्रपट ‘दृश्यम’ हॉलिवूड गाजवणार; इंग्रजी रिमेक येतोय!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 01, 2024 05:28 PM IST

Drishyam Hollywood Remake : कमल हासन, व्यंकटेश आणि अजय देवगण (Ajay Devgn) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या दृश्यमचा विविध भारतीय भाषांमध्ये रिमेक झाल्यानंतर आता दृश्यमचा इंग्रजी रिमेक पाहायला मिळणार आहे.

Drishyam Remake : अजय देवगणचा सुपरहिट चित्रपट ‘दृश्यम’ हॉलिवूड गाजवणार
Drishyam Remake : अजय देवगणचा सुपरहिट चित्रपट ‘दृश्यम’ हॉलिवूड गाजवणार

Drishyam hollywood Remake : बॉलिवूड स्टार अजय देवगणचा (Ajay Devgn) सुपरहिट चित्रपट दृश्यम असंख्य भाषेत रिमेक झाल्यानंतर आता हॉलिवूडमध्ये झळकणार आहे. दृश्यम हा रिमेक भारत आणि चीनमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर जागतिक बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे.

निर्माते कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांनी कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२३ (Cannes Film Festival 2003 ) मध्ये थ्रिलर फ्रँचायझीच्या कोरियन रिमेकची घोषणा केली. त्यानंतर हा चित्रपट हॉलिवूडमध्ये पाहायला मिळणार, अशी माहिती ट्रेड अ‍ॅनालिस्ट रमेश बाला यांनी ट्वीट केले.

श्रीधर पिल्लई यांनी एक्सवर असेही सांगितले की, आंतरराष्ट्रीय रिमेकचे हक्क मूळ निर्मात्यांकडून विकत घेतले गेले आहेत."पॅनोरमा स्टुडिओने दृश्यम १ आणि २ चे आंतरराष्ट्रीय रिमेक हक्क मूळ निर्माते आशीर्वाद सिनेमाजकडून विकत घेतले आहेत."

दृश्यम हा २०१३ मध्ये मल्याळम चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा तो मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला आणि इतर चित्रपट निर्मात्यांनी रिमेक हक्कांसाठी स्पर्धा केली. २०१४ मध्ये या चित्रपटाचा कन्नडमध्ये दृश्य आणि तेलुगूमध्ये द्रुश्याम या नावाने रिमेक करण्यात आला, ज्यात अनुक्रमे रविचंद्रन आणि व्यंकटेश मुख्य भूमिकेत होते. २०१५ मध्ये तमिळमध्ये पापनासम आणि हिंदीमध्ये दृश्यम या नावाने अनुक्रमे कमल हसन आणि अजय देवगण यांचा रिमेक करण्यात आला होता.

२०१७ मध्ये सिंहलीमध्ये जॅक्सन अँथनीसोबत धर्मयुद्ध आणि २०१९ मध्ये मँडरिन चायनीज भाषेत शियाओ यांगसोबत शीप विदाऊट अ शेफर्ड या नावाने रिमेक करण्यात आला. हा चित्रपट वेगवेगळ्या भाषेत प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे इंडोनेशिया आणि कोरियामध्ये रिमेक करण्याचे आधीच काम सुरू आहे. आता हा चित्रपट हॉलिवूडमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे.

WhatsApp channel

विभाग