भारतातील प्रसिद्ध गायिका उषा उत्थप यांचे पती जानी चाको उत्थप यांचे निधन झाले. सोमवारी, ८ जुलै रोजी जानी यांनी राहत्या घरात अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. जानी यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, जानी कोलकात्यामधील घरी टीव्ही पाहत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जानी यांच्या मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. जानी यांच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येतील, असेही कुटुंबीयांनी सांगितले.
वाचा: “रिचार्जचे पैसे जस्टिन बिबरच्या खिशात", अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्यावर मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट
उषा आणि जानी यांची पहिली भेट सत्तरच्या दशकात आइकॉनिक ट्रिनकासमध्ये झाली होती. त्यांना एक मुलगी अंजली उत्थुप आणि मुलगा सनी उत्थुप आहे. जानी हे चहाचे मोठे व्यावसायिक होते. ते चहाची बागायत करत असत.
वाचा: श्रेया मोठा गेम झाला यार; ‘पुन्हा दुनियादारी’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल उषा यांना नुकताच पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हा मोठा पुरस्कार मिळाल्यानंतर उषा यांनी एका वृत्तावाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी त्या म्हणाल्या की, 'हा माझ्यासाठी अविश्वसनीय क्षण आहे. माझा विश्वासच बसत नाहीये. माझी प्रतिभा ओळखल्याबद्दल मी भारत सरकारचे आभार मानतो.'
वाचा: जुई गडकरी हिला लग्नाच्या पंगतीतून उठवलं होतं; नेमकं काय घडलं होतं? वाचा!
अशा प्रसंगी बप्पी लाहिरी यांची खूप आठवण येत असल्याचेही उषा यांनी यावेळी सांगितले. खरं तर बप्पी आणि उषा यांनी एकत्र अनेक हिट गाणी दिली आहेत ज्यात रंबा हो, हरी ओम हरी आणि कोई नाचे-नाचे येथे या गाण्याचा समावेश आहे. उषा म्हणाल्या होत्या की, 'मला बप्पीची खूप आठवण येत आहे आणि आरडी बर्मनचीही.'
संबंधित बातम्या