Abhijeet Bhattacharya : 'महात्मा गांधी पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते' म्हणणं अभिजीत भट्टाचार्यला भोवणार?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Abhijeet Bhattacharya : 'महात्मा गांधी पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते' म्हणणं अभिजीत भट्टाचार्यला भोवणार?

Abhijeet Bhattacharya : 'महात्मा गांधी पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते' म्हणणं अभिजीत भट्टाचार्यला भोवणार?

Jan 05, 2025 09:13 AM IST

Abhijeet Bhattacharya Legal Trouble : बॉलिवूड गायक अभिजीत भट्टाचार्यने काही दिवसांपूर्वी महात्मा गांधींविषयी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. आता एका वकिलाने या प्रकरणी गायकाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

अभिजीत भट्टाचार्य
अभिजीत भट्टाचार्य

Abhijeet Bhattacharya Legal Trouble : बॉलिवूड गायक अभिजीत भट्टाचार्य याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये आपला आवाज दिला आहे. त्याची गाणी लोकांना खूप आवडतात. आपल्या आवाजासाठी प्रसिद्ध असलेला अभिजीत आपले म्हणणे बेधडकपणे मांडण्यासाठी ओळखला जातो. गायक अनेकदा वादग्रस्त विधानेही करत असतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिजीतने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. अभिजीत म्हणाला होता की, महात्मा गांधी पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते. आता पुण्यातील एका वकिलाने त्यांना या प्रकरणी नोटीस पाठवली आहे.  

पुण्यातील एका वकिलाने अभिजीत भट्टाचार्य यांना महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल कायदेशीर नोटीस पाठवली आहे. आपल्या वक्तव्याबद्दल लेखी माफी न मागितल्यास त्यांच्यावर फौजदारी खटला चालवला जाईल, असे वकील असीम सरोदे यांनी म्हटले आहे. या नोटिशीत म्हटले आहे की, गायकाने अशी टिप्पणी करून आपली मर्यादा ओलांडली आहे. १५० हून अधिक देशांनी महात्मा गांधी यांच्या नावाने टपाल तिकिटे जारी केली असल्याने गायकाने त्याच्या व्यक्तव्याची वस्तुस्थिती तपासावी, असे वकिलांनी म्हटले.  

अभिजीत भट्टाचार्य काय म्हणालेला?

शुभंकर मिश्रा यांच्या पॉडकास्टमध्ये अभिजीत भट्टाचार्य असेही म्हणाला की, ‘संगीतकार आरडी बर्मन हे महात्मा गांधींपेक्षा मोठे होते. महात्मा गांधी जसे राष्ट्रपिता होते, तसेच आर. डी. बर्मन हे संगीत विश्वाचे राष्ट्रपिता होते.’ इतकंच नाही तर, अभिजीत महात्मा गांधींना पाकिस्तानचे राष्ट्रपिता म्हटले होते. 

गरीबी इतकी की खिचडी पाणी मिसळून खाल्ली, आडनावही सोडून दिले! रवी किशननं काय काय भोगले?

शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये गायक अभिजीत भट्टाचार्य म्हणाला होता की, ‘महात्मा गांधी भारतासाठी नव्हते, ते पाकिस्तानसाठी होते. भारत आधीपासूनच भारत होता, पाकिस्तानची निर्मिती झाली होती. त्यांना चुकून राष्ट्रपिता महात्मा गांधी असे संबोधण्यात येत होते. ते पाकिस्तानचे निर्माते होते. ते पाकिस्तानचे पिता होते, आजोबा होते... सर्व काही तेच होते.’

आरडी बर्मन यांनी केले होते लाँच!

अभिजीत भट्टाचार्य याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात एका बंगाली चित्रपटात गाणे गाऊन केली होती. त्याला संगीतकार आरडी बर्मन यांनी लाँच केले होते. आशा भोसले यांच्यासोबत बंगाली चित्रपटासाठी त्याने पहिलं गाणं गायलं होतं. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात तो आरडी बर्मन यांच्यासोबत गायक म्हणून स्टेज शो करत असे.अभिजीत भट्टाचार्य यांनी मिथुन चक्रवर्ती, विजय आनंद, आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान, सैफ अली खान, सनी देओल, संजय दत्त, अक्षय खन्ना, अक्षय कुमार, हृतिक रोशन, बॉबी देओल आणि रणबीर कपूर यांसारख्या बॉलिवूड कलाकारांसाठी गाणी गायली आहेत.

Whats_app_banner