बॉलिवूड गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी एका मुलाखतीत शाहरुख खान, सलमान खानबद्दल मत मांडलं. त्याचवेळी त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी एक वादग्रस्त विधान केले. मुलाखतीत बोलताना अभिजीत म्हणाला की, संगीतकार आरडी बर्मन हे महात्मा गांधींपेक्षा मोठे होते. आरडी बर्मन हे संगीत विश्वातील राष्ट्रपिता होते. महात्मा गांधी हे भारताचे नसून पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते, असेही भट्टाचार्य म्हणाले.
शुभंकर मिश्रा यांच्या पॉडकास्टमध्ये अभिजीत भट्टाचार्य म्हणाले, 'संगीतकार आरडी बर्मन हे महात्मा गांधींपेक्षा मोठे होते. महात्मा गांधी जसे राष्ट्रपिता होते, तसेच आर. डी. बर्मन हे संगीत विश्वाचे राष्ट्रपिता होते. इतकंच नाही तर अभिजीत यांनी महात्मा गांधींना पाकिस्तानचे राष्ट्रपिता म्हटले.
अभिजीत म्हणाले, महात्मा गांधी भारतासाठी नव्हते, ते पाकिस्तानसाठी होते. भारत आधीपासूनच भारत होता, पाकिस्तानची नव्याने निर्मिती झाली होती. महात्मा गांधी यांना चुकून भारताचे राष्ट्रपिता असे संबोधण्यात आले. पाकिस्तानचे निर्माता ते होते, वडील तेच होते, आजोबा ते होते, सर्व काही तेच होते.
अभिजीत भट्टाचार्य यांनीआपल्या कारकिर्दीची सुरुवात एका बंगाली चित्रपटात गाऊन केली होती, त्यांना संगीतकार आरडी बर्मन यांनी लाँच केले होते. आशा भोसले यांच्यासोबत बंगाली चित्रपटासाठी त्यांनी पहिलं गाणं गायलं होतं. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात ते आरडी बर्मन यांच्यासोबत गायक म्हणून स्टेज शो करत असत. अभिजीत भट्टाचार्य यांनी मिथुन चक्रवर्ती, विजय आनंद, आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान, सैफ अली खान, सनी देओल, संजय दत्त, अक्षय खन्ना, अक्षय कुमार, हृतिक रोशन, बॉबी देओल आणि रणबीर कपूर यांसारख्या बॉलिवूड कलाकारांसाठी गाणी गायली आहेत.
संबंधित बातम्या