बॉलिवूडमधील कलाकारांची झगमगाटाची दुनिया ही खरच सुख, शांती देणारी असते का? असा प्रश्न नेहमीच सर्वसामान्यांना पडत असतो. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार, गायक, रॅपर आहेत ज्यांचे आयुष्य प्रसिद्धी मिळाल्यानंतर उद्ध्वस्त झाले. नुकताच एका लोकप्रिय रॅपरने खासगी आयुष्यावर मोठा खुलासा केला आहे. पैसा आल्यानंतर या रॅपरने स्वत:चे आयुष्य पूर्णपणे बदलले. त्याचे संपूर्ण आयुष्य अद्ध्वस्त झाल्यानंतर आता त्याने यावर वक्तव्य केले आहे. चला जाणून घेऊया हा अभिनेता आहे तरी कोण?
बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक हनी सिंग हा कायमच चर्चेत असतो. लवकरच त्याचा 'ग्लोरी' हा अल्बम येणार आहे. या अल्बमचे तो सध्या प्रमोशन करताना दिसत आहे. त्याचा हा अल्बम वादग्रस्त जीवनाशी संबंधीत असल्याचे हनी सिंगने सांगितले आहे. एका मीडिया हाऊसशी बोलताना त्याने ड्रग्जमुळे आपलं आयुष्य कसं बरबाद झालं हे सांगितलं. त्यांची मानसिक स्थिती ढासळली होती. हे लक्षात येताच हनीने सर्व काही सोडून केवळ आरोग्याला प्राधान्य दिले. बरे व्हायला ७ वर्षे लागली पण यादरम्यान तो पत्नी शालिनीपासूनही दूर गेला. हनी सिंगने सांगितले की, 'मला पैसा, ड्रग्ज आणि महिलांचे व्यसन लागले होते.'
हनी सिंगचे आयुष्य खूप वादग्रस्त राहिले आहे. आता त्याने पुनरागमन केले आहे. आपल्या अल्बमचे प्रमोशन करत असलेल्या हनी सिंगने लल्लनटॉपला सांगितले की, 'लग्नाचे ९ ते १० महिने चांगले घालवले. त्यावेळी आमचे संबंध चांगले नव्हते. मी खूप प्रवास करत असल्यामुळे आमच्यामध्ये अंतर निर्माण झाले होते. सुरुवातीला गोष्टी चांगल्या होत्या. मग यश आणि प्रसिद्धी माझ्या डोक्यावर चढली होती. त्यामुळे मी कुटुंबाकडे दुर्लक्ष करत होतो. पैसा, प्रसिद्धी, ड्रग्ज आणि महिलांचे मला व्यसन लागले होते. मी धोकादायक गोष्टी केल्या. मी शालिनीला जवळजवळ विसरूनच गेलो होतो.'
हनी सिंगला या मुलाखतीमध्ये विचारण्यात आले की त्याला ड्रग्जची ओळख कोणी करुन दिली? त्यावर हनीने उत्तर दिले की, 'काही नावे आहेत, खूप प्रभावी नावे आहेत. त्यांनी मला खूप चिडवले. मला या गोष्टींचे इतके व्यसन लागले होते की मी एका वेगळ्या विश्वात होतो. बऱ्याचवेळा मला माझ्या सभोवताली काय सुरु आहे याची माहितीही नसायची.'
वाचा: व्हॅनिटी व्हॅनमध्ये छुपे कॅमेरे, ते कपडे बदलताना पाहायचे; अभिनेत्रीने केला खबळजनक खुलासा
तुझे व्यसन कसे सुटले? असा प्रश्न हनी सिंगला पुढे विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणाला, 'हे सर्व व्यसन सोडण्यासाठी मला पुनर्जन्म घेण्याची गरज नाही, असा माझा आग्रह होता. मी दारू, चरस आणि इतर पदार्थांचा त्याग केला. मी माझ्या कुटुंबियांना माझ्या मानसिक आरोग्याबद्दल सांगितले. त्यावर त्यांनी त्वरित उपचार करणे आवश्यक असल्याचे सांगितले. मी माझ्या आरोग्यास प्राधान्य दिले आणि मी बरे होईपर्यंत काम करण्यास नकार दिला. बरे व्हायला ७ वर्षे लागली.'